लंडन WTC Final 2025 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाईल. हा सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. 11 ते 15 जून दरम्यान होणाऱ्या या सामन्यात पावसाची शक्यता आहे. अशात जर हा सामना बरोबरीत सुटला तर विजेता कोण असेल? कोणता नियम लागू होईल आणि राखीव दिवसासाठी काय नियम आहे? याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
A stellar batting ensemble ready to set the Ultimate Test on 🔥
— ICC (@ICC) June 8, 2025
Your complete guide to the #WTC25 Final 📲 https://t.co/SSsSiOKmtu pic.twitter.com/1b4yxjpUcQ
तिसरी फायनल : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हा तिसरा अंतिम सामना आहे. मागील आवृत्तीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं भारताला हरवून विजेतेपद पटकावलं होतं. त्यापुर्वीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला होता. यावेळी मात्र भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही.
From fringe figure to #WTC25 Final hopeful 👊
— ICC (@ICC) June 8, 2025
Beau Webster emerges as a point of difference in the Ultimate Test 👇https://t.co/6jPsX5bZGw
आफ्रिका प्रथमच खेळणार फायनल : टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका प्रथमच WTC फायनल खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियानं सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला असला तरी, त्यांना त्यांचं दुसरं विजेतेपद जिंकायचं स्वप्न आहे. या जेतेपदाच्या लढतीसाठी एक दिवसाचा राखीव दिवस देखील आहे.
Josh Hazlewood is unbeaten in Tests at Lord's 😮
— ICC (@ICC) June 8, 2025
Will the Proteas spoil the streak in the #WTC25 Final? 🤔
✍️: https://t.co/7KhL1D1Qw8 pic.twitter.com/blHDEbgLLW
दक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया WTC फायनल 2025 :
- तारीख - 11 ते 15 जून
- राखीव दिवस - 16 जून
- सामन्याची वेळ - भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता
- स्थळ - लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड
Marco Jasen is focused on execution ahead of the all-important Ultimate Test 💪#WTC25 | Read more ➡️ https://t.co/CF4H1nSxsS pic.twitter.com/W4KfLIKqfO
— ICC (@ICC) June 7, 2025
- WTC फायनलमध्ये एक दिवसाचा राखीव दिवस असतो, जो पावसामुळं सामन्यात व्यत्यय आणल्यामुळं किंवा कमी प्रकाशामुळं सामना लवकर संपल्यास भरपाई म्हणून घेण्यात आला आहे. सामना अनिर्णित राहिल्यास कोणता नियम लागू होतो? चला जाणून घेऊया.
Josh Hazlewood is 🔙 in the Aussie camp and training hard for the #WTC25 Final beginning on June 11 💪
— ICC (@ICC) June 7, 2025
➡️ https://t.co/7KhL1D1Qw8 pic.twitter.com/4AM2jRyU4u
2023-25 च्या WTC च्या पॉइंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर होता. पण जर अंतिम सामना अनिर्णित राहिला तर या आधारावर विजेता घोषित केला जात नाही. आयसीसीच्या नियम 16.3.3 नुसार, जर अंतिम सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केलं जाईल आणि मिळालेली बक्षीस रक्कम दोन्ही संघांमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल.
Australia spinner Nathan Lyon expects a real challenge for batters in the Ultimate Test at Lord's 👊#WTC25 | Read more ➡️ https://t.co/Lns0Doyjg5 pic.twitter.com/9ciBi0YdqQ
— ICC (@ICC) June 7, 2025
सामन्यादरम्यान हवामान कसं असेल : 11 जूनपूर्वी आणि नंतर लंडनमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान अहवालानुसार, 11 ते 15 जून दरम्यान शहरात ढगाळ वातावरण राहील, तसंच पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा :