चेन्नई Who is Vignesh Puthur : आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा संघ चांगलाच अडचणीत आला. प्रथम फलंदाजी करताना त्यांना फक्त 155 धावा करता आल्या. त्यानंतर, चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर, त्यांनी रोहित शर्माच्या जागी प्रभावी पर्याय म्हणून 24 वर्षीय डावखुरा मिस्ट्री फिरकी गोलंदाज आणला. या स्पर्धेत पदार्पण करणारा हा गोलंदाज त्यांच्यासाठी वरदान ठरला. पहिल्यांदाच वरिष्ठ क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूनं पहिल्या 3 षटकांत 3 बळी घेऊन सीएसकेला अडचणीत आणलं. शेवटी, आयपीएलच्या पदार्पणातच खळबळ उडवून देणारा हा अज्ञात गोलंदाज कोण आहे? जाणून घेऊया.
𝘼 𝙙𝙧𝙚𝙖𝙢 𝙙𝙚𝙗𝙪𝙩 ✨
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
Twin strikes from the young Vignesh Puthur sparks a comeback for #MI 💙
Updates ▶️ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @mipaltan pic.twitter.com/DKh2r1mmOx
दिग्गजांची विकेट घेत पदार्पण : मुंबई इंडियन्सनं ज्या गोलंदाजाला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली त्याचं नाव विघ्नेश पुथूर आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की केरळच्या या खेळाडूनं कधीही वरिष्ठ क्रिकेट खेळलेलं नाही. त्याला अद्याप त्याच्या राज्याच्या वरिष्ठ संघात स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. इतका कमी अनुभव असूनही, त्यानं आपल्या फिरकी गोलंदाजीनं चेन्नईच्या मोठ्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवायला लावलं.
पहिल्याच सामन्यात टिच्चून गोलंदाजी : आयपीएलमधील त्याच्या पहिल्याच षटकात विघ्नेशनं चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचा बळी घेतला. विघ्नेशनं ऑफ-स्टंपच्या बाहेर गायकवाडला एक पूर्ण लांबीचा चेंडू टाकला, जो त्यानं थेट विल जॅक्सच्या हातात मारला. त्याच्या दुसऱ्याच षटकात, त्यानं फिरकी गोलंदाजांविरुद्ध षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवम दुबेला झेलबाद केलं. दुबेनं त्याच्या फ्लाइटेड डिलिव्हरीवर लॉन्ग-ऑनकडे शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि तिलक वर्मानं त्याला झेल घेतला. यानंतर दीपक हुडा पुथूरचा तिसरा बळी ठरला. त्यानं स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि डीप स्क्वेअर लेगवर त्याचा झेल पडला. अशाप्रकारे, विघ्नेश पुथूरनं 4 षटकांत फक्त 32 धावा देत 3 बळी घेतले आणि तो चर्चेचा विषय बनला.
दक्षिण आफ्रिकेत घेतलं प्रशिक्षण : विघ्नेश पुथूरनं त्याच्या राज्यासाठी फक्त 14 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील स्तरावर खेळला आहे. याशिवाय, तो केरळ क्रिकेट लीगमध्ये अॅलेप्पी रिपल्सकडून खेळला, जिथं त्याला 3 सामन्यांमध्ये फक्त दोन विकेट मिळाल्या. याशिवाय, त्यानं तामिळनाडू प्रीमियर लीगमध्येही भाग घेतला आहे. पण त्यानं अद्याप वरिष्ठ पातळीवर केरळचं प्रतिनिधित्व केलेलं नाही. असं असूनही, मुंबई इंडियन्स फ्रँचायझीनं ज्युनियर क्रिकेटमधील या 24 वर्षीय खेळाडूचा शोध घेतला आणि त्याला 30 लाख रुपयांच्या किमतीत संघात समाविष्ट केलं. फ्रँचायझीनं विघ्नेशची निवड करताच, त्याला SA20 लीगमध्ये त्यांच्या संघ MI केपटाऊनसोबत प्रशिक्षण घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला पाठवलं, जेणेकरुन तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या अनुभवातून शिकू शकेल.
वेगवान गोलंदाज बनला फिरकी गोलंदाज, वडील चालवतात ऑटोरिक्षा : आयपीएल पदार्पणातच धुमाकूळ घालणाऱ्या विघ्नेश पुथूरसाठी हा प्रवास इतका सोपा नव्हता. एक क्रिकेटपटू म्हणून त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला कारण तो एका अतिशय साध्या कुटुंबातून आला आहे. त्याचे वडील ऑटोरिक्षा चालवतात, ज्यावरुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. जर आपण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोललो तर, सुरुवातीच्या काळात तो डाव्या हातानं वेगवान गोलंदाजी करायचा. पण स्थानिक क्रिकेटपटू मोहम्मद शेरीफनं त्याला पाहिलं आणि लेग स्पिन गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. तेव्हा विघ्नेशला माहित नव्हते की डाव्या हाताच्या मनगटाच्या फिरकी गोलंदाजाला चायनामन गोलंदाज देखील म्हणतात. तथापि, त्यानं त्याच्या गोलंदाजीवर काम सुरु ठेवलं. त्यानंतर तो आपली कारकीर्द पुढे नेण्यासाठी मलप्पुरमहून त्रिशूरला गेला आणि सेंट थॉमस कॉलेजकडून केरळ कॉलेज प्रीमियर टी-20 लीगमध्ये खेळला, जिथं तो सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता. यानंतर, त्यानं जॉली रोव्हर्स क्रिकेट क्लबसाठी सातत्यानं चांगली कामगिरी केली, ज्यामुळं त्याला केसीएलमध्ये अॅलेप्पी रिपल्स संघात खेळण्याची संधी मिळाली. येथून त्याचं करिअर पूर्णपणे बदललं.
हेही वाचा :