विशाखापट्टणम Who is Ashutosh Sharma : आशुतोष शर्मा... हे नाव सध्या क्रिकेट चाहत्यांच्या ओठांवर आहे. या खेळाडूनं कामच असं केलं आहे. याला काम म्हणता कामा नये तर चमत्कार म्हणायला हवा. कारण जेव्हा एखादा संघ 40 चेंडूत 5 विकेट गमावतो आणि 210 धावांचा पाठलाग करत असतो आणि तरीही तुम्ही संघाला विजय मिळवून देता तेव्हा तो चमत्कारच असतो. आशुतोष शर्मानं लखनऊविरुद्ध असंच केलं. या उजव्या हाताच्या फलंदाजानं 5 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीनं 66 धावांची नाबाद खेळी केली. या खेळाडूनं विप्राज निगमसोबत अवघ्या 19 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली आणि अशा प्रकारे दिल्लीनं लखनऊच्या जबड्यातून सामना हिसकावून घेतला.
Finisher for a reason 💙❤️ pic.twitter.com/iKd4J1ke2H
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 25, 2025
आशुतोष शर्माची चौफेर फटकेबाजी : दिल्ली कॅपिटल्सचा संघ लखनऊविरुद्ध संघर्ष करत होता. त्यांनी 210 धावांचा पाठलाग करताना फक्त 6.4 षटकांत 5 विकेट गमावल्या होत्या. मॅक-गार्क, समीर रिझवी, अक्षर पटेल, डू प्लेसिस हे सर्व दिग्गज फलंदाज बाद झाले, त्यानंतर आशुतोष शर्मा क्रीजवर आला आणि त्यालाही अडचणीचा सामना करावा लागला. आशुतोषनं पहिल्या 20 चेंडूत फक्त 20 धावा केल्या, पण पुढच्या 11 चेंडूत त्यानं 46 धावा केल्या.
THIS IS PEAK IPL, BABY...!!!! 🥶
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 24, 2025
- Delhi Capitals chase down 210 with just 1 wicket left, after being 7/3 and 65/5. 🤯 pic.twitter.com/sVwSyJJ1yu
दिल्लीचा सर्वात मोठा विजय : आशुतोष शर्मानं 16 व्या षटकापासून फटकेबाजीला सुरुवात केली. या खेळाडूनं प्रिन्स यादवच्या षटकात 3 चौकार आणि 1 षटकार मारुन आपला हेतू स्पष्ट केला. यानंतर 18व्या षटकात, आशुतोषनं रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर 2 षटकार आणि 1 चौकार मारुन सामना रोमांचक बनवला. प्रिन्स यादवच्या 19व्या षटकात आशुतोष वर्मानं पुन्हा एक षटकार आणि एक चौकार मारला. आता दिल्लीला शेवटच्या षटकात 3 धावांची आवश्यकता होती. यात मोहित शर्मा पहिल्या चेंडूवर बाद होण्यापासून वाचला आणि दुसऱ्या चेंडूवर त्यानं एक धाव घेतली. यानंतर, आशुतोषनं शाहबाज अहमदच्या चेंडूवर षटकार मारुन दिल्लीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. धावांचा पाठलाग करताना दिल्ली संघाचा हा सर्वात मोठा विजय होता.
𝐂𝐎𝐋𝐃𝐄𝐒𝐓 𝐈𝐌𝐀𝐆𝐄 𝐎𝐍 𝐓𝐇𝐄 𝐈𝐍𝐓𝐄𝐑𝐍𝐄𝐓 𝐓𝐎𝐃𝐀𝐘? 🥶 pic.twitter.com/Ouwuindtta
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 24, 2025
युवराजचा विक्रम मोडला : स्थानिक क्रिकेटमध्ये रेल्वेकडून खेळताना, आशुतोषचं नाव पहिल्यांदाच चर्चेत आलं जेव्हा त्यानं 2023 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध अवघ्या 11 चेंडूत अर्धशतक झळकावलं. भारतीय क्रिकेट इतिहासातील हे सर्वात जलद अर्धशतक होतं, ज्यानं युवराज सिंगचा 12 चेंडूंचा विक्रमही मोडला. त्याच्या खेळीनं आयपीएल संघांचं लक्ष वेधून घेतलं आणि 2024 च्या लिलावात पंजाब किंग्जनं त्याला 20 लाख रुपयांना त्यांच्या संघात सामील केलं. पदार्पणाच्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध त्यानं केलेल्या 31 धावांच्या स्फोटक खेळीनं हा खेळाडू खास असल्याचं सिद्ध केलं.
A win for the ages 💙❤️ pic.twitter.com/DmeAgPoGES
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 24, 2025
मेगा लिलावात झाला करोडपती : आयपीएल 2024 मध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर, जेव्हा आशुतोषनं आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 30 लाखांच्या बेस प्राईससह प्रवेश केला, तेव्हा दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात जोरदार बोली युद्ध दिसून आलं. अखेर दिल्ली कॅपिटल्सनं त्याला 3.80 कोटी रुपयांना विकत घेतलं, यावरुन हे दिसून आलं की आशुतोष आता फक्त एक उदयोन्मुख स्टार राहिलेला नाही तर तो क्रिकेटमध्ये एक मोठा खेळाडू बनला आहे.
Never gave up hope 💪
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2025
Never stopped believing 👊
A special knock and match to remember for the ages 🥳#DC fans, how's the mood? 😉
Scorecard ▶ https://t.co/aHUCFODDQL#TATAIPL | #DCvLSG | @DelhiCapitals pic.twitter.com/HYeLTrEjTn
सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी : आयपीएल 2025 मधील आतापर्यंतच्या सर्वात रोमांचक सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सनं शेवटच्या षटकात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला. विशाखापट्टणम इथं खेळल्या गेलेल्या हंगामातील चौथ्या सामन्यात स्फोटक फलंदाजी दिसून आली, ज्यात लखनऊनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 209 धावांचा मोठा डोंगर उभारला. त्यांच्याकडून निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांनी शानदार फलंदाजी केली. नंतर, फक्त 7 धावांत 3 विकेट आणि 65 धावांत 5 विकेट गमावलेल्या दिल्लीनं आशुतोष शर्मा (नाबाद 66) च्या बळावर जोरदार पुनरागमन केलं आणि शेवटच्या षटकात फक्त 1 विकेटनं सामना जिंकला.
Fearless ✅
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2025
Courageous ✅
For his 𝙍𝙤𝙖𝙧𝙞𝙣𝙜 game-changing knock, Ashutosh Sharma bags the Player of the Match award 🏆💙
Scorecard ▶ https://t.co/aHUCFODDQL#TATAIPL | #DCvLSG | @DelhiCapitals pic.twitter.com/jHCwFUCvP5
हेही वाचा :
- IPL 2025: शुभमन गिलसमोर श्रेयस अय्यरच्या 'किंग्ज'चं आव्हान; कशी असेल दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11, वाचा सविस्तर
- 'CSK वर कायमची बंदी घाला...' खलील-ऋतुराजचा व्हिडिओ शेअर करत नेटकऱ्यांचा 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप
- वडील चालवतात ऑटोरिक्षा, कधीही खेळलं नाही वरिष्ठ क्रिकेट; मुंबईनं शोधलेला विघ्नेश पुथूर कोण आहे?