ETV Bharat / sports

अखेर ठरलं...! 'या' तारखेला सुरु होणार IPL 2025, लवकरच जाहीर होणार टाईम टेबल; BCCI चा मोठा निर्णय - IPL DATES 2025

आयपीएल 2025 लवकरच सुरु होणार आहे. अलीकडेच, त्याच्या सुरुवातीच्या आणि अंतिम सामन्यांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्याचं संपूर्ण वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केलं जाईल.

IPL Timetable Dates
ipl (ANI photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 8, 2025, 9:33 AM IST

कोलकाता IPL Timetable Dates : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा पुढील हंगाम लवकरच सुरु होणार आहे. आयपीएल 2025 चा पहिला सामना आणि अंतिम सामना कधी खेळवला जाईल याची माहिती गेल्या काही दिवसांत आली होती. परंतु, त्याचं संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही. लवकरच बीसीसीआय त्याचं वेळापत्रकही जाहीर करेल. त्याआधी, या आयपीएलच्या या हंगामातील 5 मोठ्या आणि खास गोष्टी जाणून घेऊया.

सर्वात महागडा परदेशी आणि भारतीय खेळाडू : आयपीएल 2025 चा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर 2025 रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह इथं झाला. यात इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर विकला जाणारा सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याला गुजरात टायटन्सनं 15.75 कोटी रुपयांना खरेदी केलं. सर्वात महागडा विकला गेलेला भारतीय खेळाडू यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत होता. पंतला लखनऊ सुपर जायंट्सनं 27 कोटी रुपयांना खरेदी केलं. पंत हा या हंगामातीलच नाही तर संपूर्ण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे.

सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण खेळाडू : आयपीएल 2025 चा सर्वात वयस्कर खेळाडू टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. सीएसकेचा खेळाडू धोनी 43 वर्षांचा आहे. सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी असेल. तो फक्त 13 वर्षांचा आहे. आयपीएल 2025 च्या लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांना करारबद्ध केलं.

7 संघांचे कर्णधार निश्चित : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार अद्याप निश्चित झालेले नाहीत. तर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधार असतील.

आयपीएल 2025 कधी सुरु होईल : आयपीएलचा आगामी हंगाम 21 मार्चपासून सुरु होईल. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी त्याची सुरुवात तारीख निश्चित केली होती. पहिला सामना 21 मार्च रोजी कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे.

आयपीएल 2025 चा अंतिम सामना कधी : आयपीएलच्या नवीन हंगामात अंतिम सामन्यासह एकूण 74 सामने खेळवले जातील. ईडन गार्डन्सवरील पहिल्या सामन्याव्यतिरिक्त, आयपीएल 2025 चा अंतिम सामनाही 25 मे रोजी खेळला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर दोन प्ले-ऑफ सामने होणार आहेत.

हेही वाचा :

  1. कांगारुंचे दोन फलंदाज यजमानांविरुद्ध डबल सेंच्युरी झळकावत इतिहास रचणार? पाहा लाईव्ह मॅच
  2. 'कीवीं'चा संघ शेजाऱ्यांना त्यांच्याच भूमिवर पराभूत करत Champions Trophy पूर्वी धक्का देणार? ऐतिहासिक मॅच 'इथं' पाहा लाईव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.