मथुरा Wheelchair Cricketer Died on Train : पंजाबचा दिव्यांग क्रिकेटपटू विक्रम सिंग जो क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्यासाठी लुधियानाहून ग्वाल्हेरला जात होता, त्याची प्रकृती अचानक बिघडल्यानं छत्तीसगड एक्सप्रेस ट्रेनमध्ये त्याचा मृत्यू झाला. यामुळं क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
ग्वाल्हेरला करत होता प्रवास : मीडिया रिपोर्ट्सनुसार, 4 जून रोजी सकाळी ट्रेन मथुरा जंक्शनवर पोहोचत असताना 39 वर्षीय विक्रम सिंगचा मृत्यू झाला. विक्रम त्याच्या संघासह ग्वाल्हेर इथं होणाऱ्या 7व्या श्रीमंत माधवराव सिंधिया मेमोरियल टी-10 चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार होता, जी 5 जूनपासून सुरु होणार होती.
Vikram , a fellow wheelchair cricketer from Punjab, passed away during a train journey. He collapsed long before the train reached Mathura station. A medical emergency was called at 4:41 AM, but despite the urgency, the train had already been halted for over 1.5 hours before… pic.twitter.com/hC4yeW3U2V
— Somjeet Singh Gaur (@Somjeet_Singh07) June 4, 2025
एका सहकारी खेळाडूनं फोन करुन मागितली होती वैद्यकीय मदत : विक्रम सिंगचा सहकारी सोमजीत सिंग गौर यानं एका निवेदनात म्हटलं आहे की, वैद्यकीय मदतीसाठी पहाटे 4:58 वाजता रेल्वे हेल्पलाइन नंबरवर कॉल करण्यात आला. परंतु, वेळेवर मदत न मिळाल्यामुळं सकाळी 8:10 वाजता विक्रम सिंगचं निधन झाले. सहकारी खेळाडूनं आरोप केला की वारंवार फोन करुनही वैद्यकीय पथक आलं नाही आणि ट्रेन मथुरा जंक्शनच्या आधी दीड तास थांबली. तो आमच्या डोळ्यासमोर वेदनेनं तडफडत राहिला आणि नंतर मरण पावला पण आम्ही काहीही करु शकलो नाही.
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला : दिव्यांग खेळाडू विक्रम सिंगचा ट्रेनमध्ये मृत्यू झाल्यानंतर, जीआरपीनं त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कारवाई सुरु केली आहे. विक्रमच्या कुटुंबाला कळवल्यानंतर, संघातील इतर सदस्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्वाल्हेरला रवाना झाले. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वेनं चौकशीचे आदेश दिले आहेत. विक्रम हा पंजाबमधील मालेरकोटला जिल्ह्यातील अहमदगढजवळील पोहिर गावचा रहिवासी होता. 2020 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याला भारताच्या व्हीलचेअर संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठीही बोलावण्यात आले होते. मात्र कोविड-19 मुळं ही मालिका रद्द करण्यात आली होती.
हेही वाचा :