दुबई Prize Money for WTC : आयसीसीनं 2025 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी सर्व संघांसाठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. अंतिम सामना अजून खेळला गेलेला नाही, त्यामुळं पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल हे माहित नाही, परंतु उर्वरित संघ निश्चित झाले आहेत. म्हणून त्यांच्या नावासमोर बक्षीसाची रक्कम लिहिली जाईल. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या टीम इंडियालाही भरपूर पैसे मिळणार आहेत, तर पाकिस्तानची अवस्था यातही वाईट आहे. पाकिस्तानचा वाटा खूपच कमी असेल.
It's exciting to announce that the winner of the #WTC25 Final between South Africa and Australia will earn $3.6M, with the runner-up to receive $2.1M. The increase in prize money exhibits our efforts to prioritize Test cricket and build on momentum from previous WTC cycles. @ICC pic.twitter.com/GMgWxM7GSb
— Jay Shah (@JayShah) May 15, 2025
WTC फायनल जिंकणाऱ्या संघाला किती रुपये मिळतील : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 11 जूनपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाईल. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ एकमेकांसमोर येतील. दरम्यान, आयसीसीनं बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. अंतिम फेरीत जो संघ जिंकेल त्याला 30 कोटी 81 लाख रुपये दिले जातील, तर दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संघाला म्हणजेच अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 18 कोटी 50 लाख रुपये दिले जातील. हे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संघांबद्दल आहे. आता आपण टीम इंडियाबद्दल बोलूया, जे यावेळी अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित करु शकली नाही, परंतु संघ निश्चितच तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.
Record figures 💰
— ICC (@ICC) May 15, 2025
The #WTC25 prize pool has been revealed ahead of the Ultimate Test 👇https://t.co/09tsNlB18Z
टीम इंडियालाही किती रुपये मिळतील : तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याबद्दल भारतीय संघाला 12 कोटी 85 लाख रुपये दिले जातील. पाकिस्तानला इथंही काहीही मिळालेलं नाही. संपूर्ण हंगामात संघाला सतत पराभवांचा सामना करावा लागला आहे. याचा परिणाम असा झाला की संघ नवव्या स्थानावर राहिला आहे. पाकिस्तानला फक्त 4 कोटी 11 लाख रुपये दिले जातील. वास्तविक ही बक्षीस रक्कम डॉलर्समध्ये जाहीर करण्यात आली आहे, परंतु तुमच्या सोयीसाठी आम्ही ती रुपयांमध्ये रुपांतरित केली आहे. रुपया आणि डॉलरचं मूल्य दररोज बदलतं, त्यामुळं अंतिम बक्षीस रकमेत थोडा फरक असू शकतो.
2023 WTC Final Prize money:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 15, 2025
Winner - 13.23cr.
Runners Up - 6.61cr.
2025 WTC Final Prize money:
Winner - 30.78cr.
Runners Up - 18.46cr.
SUPERB WORK FROM JAY SHAH LED ICC TO PRIORITISE TEST CRICKET...!!! 🫡 pic.twitter.com/LhRFswq2z1
भारत आणि पाकिस्तानची कामगिरी : या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडियानं एकूण 19 सामने खेळले आहेत, त्यापैकी भारतानं 9 जिंकले आणि आठ गमावले. दोन सामने बरोबरीत सुटले. भारताचा पीसीटी 50 होता, त्यामुळं संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. जर आपण पाकिस्तानबद्दल बोललो तर त्यांनी एकूण 14 सामने खेळले आणि फक्त 5 सामने जिंकले. 9 सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाचा पीसीटी 27.98 होता. यावेळी संघानं स्पर्धा शेवटच्या स्थानावर म्हणजेच नवव्या स्थानावर संपवली आहे, त्यामुळं त्यांची बक्षीस रक्कम देखील खूपच कमी आहे.
हेही वाचा :