ETV Bharat / sports

दहावीतील तरुणांनी बनवली वेब सिरीज अन् थेट वानखेडेवर IPL मॅच पाहायची मिळाली संधी - MI VS SRH MATCH

साताराच्या तरुणांना आपल्या वेब सिरीजमुळं थेट स्टेडियममध्ये सामना पाहायची संधी मिळाली.

satara students
साताराचे तरुण (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 18, 2025 at 12:47 PM IST

Updated : April 18, 2025 at 1:23 PM IST

2 Min Read

मुंबई : सध्याचं जग हे सोशल मीडियाचं मानलं जातं. प्रत्येकाचं सोशल मीडियावर अकाउंट आहे आणि प्रत्येक जण आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर सतत काही ना काही पोस्ट टाकत असतो. काहींना या पोस्ट मधून आर्थिक फायदा मिळतो तर काहींना नवनवीन संधी मिळतात. अशीच एक आगळीवेगळी संधी साताराच्या काही तरुणांना मिळाली आहे. या तरुणांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एक सिरीज पाहून चक्क आयपीएलमधील पाच वेळा विजेता ठरलेली मुंबई इंडियन्स चांगलीच प्रभावित झाली.

मुंबईचा सामना पाहण्याची संधी : वास्तविक साताराच्या सात तरुणांचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'इट्स मज्जा' असं एक चॅनल आहे. अर्थव अधाते (14), ओम पानसकर (17), सत्यजीत होमकार (13), रुद्र ईनामदार (13), श्रेयस कटके (17), संयोगिता चौधरी (18), सृष्टी दनाने (14) अशी या तरुणांची नावं आहे. मीडिया वन सोल्यूशन्स आणि सुरिन दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हे तरुण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेब सिरीजमध्ये विविध रोल करुन अपलोड करत असतात. नुकतीच त्यांनी 'दहावी अ' नावाची वेब सिरीज आपल्या या प्लॅटफॉर्मवर अपलोड केली होती. हे पाहून मुंबई इंडियन्स चांगलेच प्रभावित झाली. त्यांनी या तरुणांना गुरुवारचा हैदराबादविरुद्धचा सामना पाहण्यासाठी थेट वानखेडे स्टेडियमवर बोलावलं. इतकंच नव्हे तर सामन्याच्या दोन दिवसाआधी या तरुणांना संघांना यांच्या लाईव्ह कार्यक्रमातही सहभागी करुन घेतलं होतं. यामुळं या तरुणांना आपलं स्वप्न सत्यात उतरल्याचं भासत आहे. त्यांनी हे सर्व अनपेक्षित आणि स्वप्नवत असल्याचं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

satara students
साताराचे तरुण (ETV Bharat)

मुंबईत येऊन मुंबईची मॅच बघण्याचा अभिमान : यापैकी ओम पानसकरनं याबद्दल बोलताना सांगितलं, "आम्ही आमच्या सीरिजमध्ये क्रिकेटचा एपिसोड शुट केला. तर मुंबई इंडियन्सनं आम्हाला गेस्ट म्हणून बोलवलं. आम्ही मुंबईतच पहिल्यांदा आलो. आम्ही स्टेडियमला येऊ असा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. खुप भारी वाटतंय. मुंबईत येऊन आपल्या मुंबईची मॅच बघायला मिळते याचा अभिमान वाटतोय. आम्हाला कधी वाटलं नव्हतं मॅच बघायला जाऊ. खरच खुप भारी वाटतंय."

हा आमच्यासाठी आभिमानाचा क्षण : तसंच यानंतर संयोगिता चौधरीनं या अनुभवाबाबात बोलताना सांगितलं, "खरच खुप खुप भारी वाटतंय. आम्ही पहिल्यांदाच मुंबईत आलो. आधी आम्हाला याबाबत काही कल्पनाही नव्हती. हे आमच्यासाठी सर्व सरप्राईजींग आहे. स्टेडिटममध्ये बसून मॅच बघणं हे आमच्या परिवारासाठी तसंच मित्र-मैत्रिणींसाठी अभिमानाचा क्षण आहे."

सामन्यात मुंबईचा विजय : वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या या 33व्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 4 विकेट्सनं दारुण पराभव केला आहे. सनरायझर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 162 धावांचं लक्ष्य मुंबईसमोर ठेवलं होतं. मुंबईनं हे लक्ष्य सहा फलंदाजांच्या मोबदल्यात आरामशीर पार केलं. यासह मुंबईनं‌ या स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला असून त्यांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अद्याप जिवंत आहेत, तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादसाठी मात्र आता प्ले ऑफ फेरी गाठणं जवळजवळ अशक्य झाल्यासारखं आहे.

हेही वाचा :

  1. Happy Birthday IPL... 2008 मध्ये आजच्याच दिवशी झाली होती सुरुवात; पहिल्याच सामन्यात RCB 140 धावांनी झाली होती पराभूत
  2. RCB घरच्या मैदानावर पहिला सामना जिंकत पराभवाची मालिका खंडित करणार?

Last Updated : April 18, 2025 at 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.