जयपूर Virat Kohli Record : स्टार फलंदाज विराट कोहलीची आयपीएल 2025 मध्येही उत्कृष्ट कामगिरी सुरुच आहे. आरसीबीसाठी, विराट कोहली आयपीएलच्या 18 व्या हंगामात फलंदाजीत सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत आहे. आयपीएल 2025 च्या 28व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध, विराट कोहलीनं 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार अर्धशतक झळकावलं. कोहलीनं 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह कोहलीनं टी-20 क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम रचला आहे.
A century of half-centuries 💯
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
Virat Kohli brings up yet another special milestone 🙌
He is going strong in the chase with #RCB 146/1 after 15 overs 🔝
Updates ▶ https://t.co/rqkY49M8lt#TATAIPL | #RRvRCB | @RCBTweets | @imVkohli pic.twitter.com/MjjVw3KPLP
कोहलीचं शतक : विराट कोहलीनं टी-20 क्रिकेटमध्ये ते स्थान मिळवलं आहे, जे ख्रिस गेललाही मिळवता आलं नाही. राजस्थानविरुद्ध अर्धशतक झळकावून कोहलीनं टी-20 क्रिकेटमधील त्याचं 100वं अर्धशतक पूर्ण केलं. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरनं 400 टी-20 सामन्यांच्या 399 डावांमध्ये 108 अर्धशतकं झळकावली आहेत.
Virat Kohli now has the joint-most 50+ scores in IPL history.
— All Cricket Records (@Cric_records45) April 13, 2025
Most 50+ scores in IPL
66* – Virat Kohli (250 innings) 🇮🇳
66 – David Warner (184 innings) 🇦🇺
53 – Shikhar Dhawan (221 innings) 🇮🇳
45 – Rohit Sharma (256 innings) 🇮🇳
43 – AB de Villiers (170 innings) 🇿🇦
43 – KL Rahul… pic.twitter.com/nTSkmDFxfP
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करणारे फलंदाज :
- डेव्हिड वॉर्नर - 108
- विराट कोहली - 100*
- बाबर आझम - 90
- ख्रिस गेल - 88
- जोस बटलर - 86
- अॅलेक्स हेल्स - 85
- शोएब मलिक - 83
Virat Kohli becomes the first Indian to score 100 fifties in T20 cricket history.
— All Cricket Records (@Cric_records45) April 13, 2025
Most T20 fifties by Indians:
100* – Virat Kohli (388 innings)
78 – Rohit Sharma (439 innings)
70 – Shikhar Dhawan (331 innings)
76 – KL Rahul (216 innings)
55 – Suryakumar Yadav (290 innings) pic.twitter.com/kyExLMdjaE
कोहलीनं आता टी-20 क्रिकेटमध्ये 109 अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यानं क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये 9 शतकं आणि 100 अर्धशतकं झळकावली आहेत. ख्रिस गेलचा विक्रम आता त्याचं लक्ष्य आहे. 2 अर्धशतकं झळकावून, भारतीय स्टार फलंदाज टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक पन्नास किंवा त्याहून अधिक धावा काढण्याच्या बाबतीत गेलला मागे टाकेल. टी-20 मध्ये सर्वाधिक पन्नासपेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरनं टी-20 मध्ये 116 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50हून अधिक धावा :
- डेव्हिड वॉर्नर - 116
- ख्रिस गेल - 110
- विराट कोहली - 109
- बाबर आझम - 101
- जोस बटलर - 94
Team-wise - Virat Kohli's 100 T20 fifties
— All Cricket Records (@Cric_records45) April 13, 2025
60 for RCB in 264 innings
39 for India in 119 innings
1 for Delhi in 5 innings
Total: 100 fifties in 388 innings pic.twitter.com/zaVijCH0k5
सामन्यात कोहलीची खेळी : विराट कोहलीनं 45 चेंडूत 62 धावांची नाबाद खेळी करत आरसीबीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार मारले. कोहली व्यतिरिक्त, देवदत्त पडिकलनं 28 चेंडूत 40 धावा केल्या आणि नाबाद परतला. सलामीवीर फिल साल्टनं 33 चेंडूत 65 धावा केल्या. त्यानं त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 6 षटकार मारले.
हेही वाचा :