लीड्स ENG Beat IND : लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात एकूण 5 शतकं झळकावली, परंतु तरीही टीम इंडिया सामना वाचवण्यात अपयशी ठरली. इंग्लंडनं चौथ्या डावात 371 धावांचं मोठं लक्ष्य गाठून कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. इंग्लंडनं कसोटी इतिहासातील 10 वा सर्वात मोठा धावांचा पाठलाग पूर्ण केला आहे. तसंच भारताविरुद्ध कसोटी इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे.
A staggering run chase from England in Leeds to go 1-0 up against India 🙌#WTC27 | #ENGvIND 📝: https://t.co/FXxW1Hk8VO pic.twitter.com/7Zf3iUY9lr
— ICC (@ICC) June 24, 2025
मालिकेत 1-0 आघाडी : यापूर्वीही 2022 मध्ये इंग्लंडनं बर्मिंगहॅम इथं भारताविरुद्ध चौथ्या डावात 378 धावांचं लक्ष्य गाठलं. दोन्ही कसोटींमध्ये इंग्लंडचे हे दोन सर्वात मोठे धावांचा पाठलाग आहेत. या सामन्याच्या पहिल्या डावात भारतानं 471 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडनं 465 धावा केल्या. भारतीय संघाचा दुसरा डाव 364 धावांवर आटोपला. अशाप्रकारे इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं लक्ष्य मिळालं. या विजयासह इंग्लंडनं अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्याच सामन्यात गिलला कर्णधार म्हणून अपयश : 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत हा भारताचा पहिला सामना होता. तसंच शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारताचा हा पहिलाच कसोटी सामना होता. या सामन्यापासून गिल-गंभीर युग सुरु झालं आहे पण संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतानं 835 धावा केल्या. संघाच्या फलंदाजांनी 5 शतकं केली. आजपर्यंत भारतानं कोणत्याही कसोटीत 5 शतकं केली नव्हती. त्यानंतरही, टीम इंडियाचा सामना गमावणं हे खूपच लज्जास्पद आहे.
🏴 ENGLAND WIN! 🏴
— England Cricket (@englandcricket) June 24, 2025
Root and Smith finish off a monster chase at Headingley to put us 1-0 up in the series!!! pic.twitter.com/G0IbjA3pEC
दुसऱ्यांदा असा पराभव : भारतानं याआधी फक्त एकदाच पहिल्या डावात यापेक्षा मोठी धावसंख्या उभारल्यानंतर पराभव पत्करला होता. 2008 च्या सिडनी कसोटीत 532 धावा उभारुनही भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करला. आतापर्यंत कसोटी इतिहासात फक्त चार वेळाच 835 पेक्षा जास्त धावा उभारुनही संघानं सामना गमावला आहे. 1948 मध्ये याच मैदानावर 861 धावा उभारुन इंग्लंडचा पराभव झाला. 2022 मध्ये पाकिस्ताननं 847 धावा उभारुन इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करला आणि न्यूझीलंडनं 837 धावा उभारुन इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करला.

First time in the 148-year history of Test cricket, a team will lose despite scoring five centuries. 🤯
— All Cricket Records (@Cric_records45) June 24, 2025
2 by Rishabh Pant
1 by Yashasvi Jaiswal
1 by Shubman Gill
1 by KL Rahul pic.twitter.com/QPSXWjtjg7
बेन डकेटनं ठोकलं वादळी शतक : इंग्लंडसाठी चौथ्या डावात बेन डकेटनं वादळी शतक ठोकलं. सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या डकेटनं 149 धावा केल्या. त्यानं फक्त 170 चेंडूत 21 चौकार आणि एक षटकार मारला. कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात भारताविरुद्ध कोणत्याही फलंदाजानं केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. डकेटनं पहिल्या विकेटसाठी जॅक क्रॉलीसोबत 188 धावांची भागीदारी केली. कसोटी इतिहासात इंग्लंडसाठी चौथ्या डावात ही सर्वोच्च सलामी भागीदारी आहे. जो रुट ५३ धावांवर नाबाद राहिला तर जेमी स्मिथ 44 धावांवर नाबाद राहिला.
England win the opening Test by 5 wickets in Headingley#TeamIndia will aim to bounce back in the 2nd Test
— BCCI (@BCCI) June 24, 2025
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND pic.twitter.com/9YcrXACbHn
हेही वाचा :