हैदराबाद SRH vs RR Live : इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामाचा दुसरा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात, सनरायझर्स हैदराबाद संघानं राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव करुन मोठ्या विजयानं हंगामाची सुरुवात केली.
An epic run-fest goes the way of @SunRisers 🧡
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
The Pat Cummins-led side registers a 4️⃣4️⃣-run win over Rajasthan Royals 👏
Scorecard ▶ https://t.co/ltVZAvInEG#TATAIPL | #SRHvRR pic.twitter.com/kjCtGW8NdV
हैदराबादचा धावडोंगर : या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं 20 षटकांत 6 गडी गमावून 286 धावा केल्या, ज्यात इशान किशननं 106 धावांची नाबाद शतकी खेळी केली तर ट्रॅव्हिस हेडनं 67 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून तुषार देशपांडेनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
Innings Break!@SunRisers register the second-highest total in #TATAIPL history putting up 286/6 on the board 😮🔥
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
Can #RR chase it down? 🤔#SRHvRR pic.twitter.com/WY8kN1EDEk
राजस्थानचीही जोरदार फलंदाजी : प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सनं 20 षटकांत 242 धावा केल्या. ज्यात संजू सॅमसननं 66 तर ध्रुव जुरेलनं 70 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये, शिमरॉन हेटमायरनं 42 धावांची जलद खेळी खेळून पराभवाचं अंतर कमी करण्याचा निश्चितच प्रयत्न केला. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून सिमरजीत सिंग आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
So run it up, the Sun is up 🔥🧡#PlayWithFire | #SRHvRR | #TATAIPL2025 pic.twitter.com/C8xHw0wle8
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 23, 2025
हैदराबादवर सर्वांच्या नजरा : या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात, गेल्या हंगामाप्रमाणे, सर्वांच्या नजरा हैदराबाद संघाच्या फलंदाजीवर असतील, ज्यांच्याकडे ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या रुपात दोन स्फोटक सलामीवीर आहेत. अशा परिस्थितीत, पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीची कठीण परीक्षा होणार आहे. या हंगामात पॅट कमिन्स पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादसाठी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे, तर रियान पराग पहिल्या तीन सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसेल.
𝗪 start to the season 💪#PlayWithFire | #SRHvRR | #TATAIPL2025
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 23, 2025
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड : आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण 20 सामने खेळले गेले आहेत. यात, सनरायझर्स हैदराबादनं वरचढ कामगिरी केली आहे. सनरायझर्स हैदराबादनं 11 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्स संघ 9 सामने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते आणि दोन्ही सामने सनरायझर्स हैदराबादनं जिंकले होते.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 :
राजस्थान : यशस्वी जयस्वाल, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, महिष तीक्षना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.
हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी.
हेही वाचा :