केपटाऊन South Africa Squad Announced : जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेचा तिसरा टप्पा नुकताच संपला आहे, तो दक्षिण आफ्रिकेच्या संघानं जिंकला आहे. यानंतर, आता संघाला नवीन मालिकेसाठी मैदानात उतरावं लागणार आहे. परंतु आता संघासाठी अशी एक बातमी आली आहे, ज्यामुळं संघाला धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेता टेम्बा बावुमा अचानक संघाबाहेर गेला आहे. त्यामुळं आता केशव महाराजला नवीन कर्णधार बनवण्यात आलं आहे.
टेम्बा बावुमा संघाबाहेर : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेला आता झिम्बाब्वेविरुद्ध टेस्ट मालिका खेळायची आहे. ही मालिका 28 जूनपासून सुरु होणार आहे. दरम्यान, प्रोटीज संघाचा नियमित कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतीमुळं मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी केशव महाराजला नवा कर्णधार बनवण्यात आलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दरम्यान टेम्बा बावुमाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. पुढील मालिकेपूर्वी तो बरा होईल असं मानलं जात होतं, परंतु तसे झाले नाही. अशा परिस्थितीत, टेम्बा सामन्याच्या एक दिवस आधी बाहेर पडणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र ही दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग नाही.
ICYMI: The #WTC25 winners have appointed a new skipper for the Zimbabwe Tests after Temba Bavuma was ruled out 👀https://t.co/0hOPWUu4IF
— ICC (@ICC) June 21, 2025
सर्वांच्या नजरा चॅम्पियन संघावर : टेम्बा बावुमा आता दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. परंतु एडेन मार्क्रम आणि कागिसो रबाडा यांना आधीच मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तेही या मालिकेचा भाग असणार नाही. लुंगी एनगिडी दुसऱ्या कसोटीपासून संघात सामील होईल. मात्र झिम्बाब्वेचा संघ कसोटीत फारसा मजबूत मानला जात नाही, त्यामुळं दक्षिण आफ्रिकेसाठी फारशी समस्या नसावी. केशव महाराजला पहिल्यांदाच कसोटीत कर्णधारपदाची संधी मिळणार आहे. याआधी त्यानं वनडे सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलं आहे. अशा परिस्थितीत, केशव महाराज कसा खेळतो हे पाहण्यासाठी त्याच्याकडंही लक्ष असेल.
Proteas Men’s Test captain Temba Bavuma has been ruled out of the upcoming two-match Test series against Zimbabwe due to a left hamstring strain.
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 20, 2025
Bavuma sustained the injury while batting during South Africa’s second innings on day three of the ICC World Test Championship Final… pic.twitter.com/MW9dXrA4r2
भारत आणि पाकिस्तानचाही दौरा करणार दक्षिण आफ्रिका : झिम्बाब्वेनंतर, दक्षिण आफ्रिका पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळेल, येथून त्यांच्यासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरु होईल. यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येईल, ही मालिका खूप महत्त्वाची असेल. आता संघ कसोटी विजेता असल्यानं सर्वांच्या नजरा त्यांच्या कामगिरीवर असतील.
दक्षिण आफ्रिकेचा संघ : डेव्हिड बेडिंगहॅम, मॅथ्यू ब्रीत्झके, डिवाल्ड ब्रेविस, कॉर्बिन बॉश, टोनी डी झोर्झी, झुबेर हमझा, केशव महाराज (कर्णधार), क्वेना मफाका, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी (दुसरी कसोटी), लुआन-ड्रे प्रिटोरियस, लेसेगो सेनोक्वेन, प्रेनेलन सुब्रायन, काइल वेरिन, कोडी यूसुफ
हेही वाचा :