ETV Bharat / sports

"माझ्या शतकाबद्दल विचार..." श्रेयस अय्यर 97 धावांवर नाबाद का राहिला? शशांकनं सांगितलं सिक्रेट - IPL 2025

आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर 97 धावा करुन नाबाद परतला.

Shashank Singh on Iyer
श्रेयस अय्यर (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : March 26, 2025 at 11:07 AM IST

2 Min Read

अहमदाबाद Shashank Singh on Iyer : आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरनं पंजाब किंग्ज (PBKS) च्या डावाच्या 17 ते 20 व्या षटकादरम्यान फक्त चार चेंडूंचा सामना केला आणि सात धावा केल्या. परिणामी तो 97 धावा करुन नाबाद परतला. विशेष म्हणजे डेथ ओव्हर्समध्ये एकदाही तीन आकड्यांपर्यंत पोहोचण्याचा विचार त्याच्या मनात आला नाही.

शशांकची आक्रमक फलंदाजी : श्रेयससोबत नॉन-स्ट्रायकर एंडवर असलेल्या शशांक सिंगनं शेवटच्या तीन षटकांत स्ट्राईक घेतला आणि पंजाबकडून चौकार आणि षटकारांची धमाकेदार खेळी केली. याबाबत शशांक म्हणाला की, 'श्रेयसचा संदेश अगदी स्पष्ट होता, माझ्या शतकाबद्दल विचार करु नकोस, फक्त शक्य तितके चौकार मार.' शशांकनं अगदी तेच केलं. पंजाबच्या डावाच्या 16 व्या षटकात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना, गेल्या आयपीएलमध्ये फिनिशर म्हणून आपली छाप पाडणाऱ्या शशांकनं गुजरातविरुद्ध फक्त 16 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या, ज्यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता, ज्यामुळं पंजाबची धावसंख्या 5 बाद 243 पर्यंत पोहोचली.

काय म्हणाला शशांक : डावाच्या ब्रेक दरम्यान शशांक स्टार स्पोर्ट्सला बोलताना म्हणाला, 'खरं सांगायचं तर, श्रेयसनं मला पहिल्याच चेंडूपासून सांगितलं होतं की माझ्या शतकाची काळजी करु नको! मी फक्त चेंडूकडे पाहत होतो आणि त्यावर फटके मारत होतो.' तसंच श्रेयस अय्यर शतकापासून हुकला याबद्दल शशांक सिंग म्हणाला, 'मी स्कोअरबोर्डकडे लक्ष दिलं नाही. मी पहिल्या चेंडूवर शॉट मारला, तो पाहिला आणि श्रेयस 97 धावांवर खेळत होता. मी काहीच बोललो नाही, तो फक्त माझ्याकडे आला आणि म्हणाला शशांक, माझ्या शतकाची काळजी करु नकोस.' अर्थात मी तुम्हाला एक धाव द्यावी की नाही हे विचारणार होतो, पण त्यासाठी खूप धाडस लागतं, आयपीएलमध्ये शतकं सहज मिळत नाहीत, असं शशांक सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला.

श्रेयसनं मला प्रेरणा दिली : छत्तीसगडच्या या अष्टपैलू खेळाडूनं सांगितलं की, 'श्रेयसच्या या कृतीनं त्याला आणखी प्रेरणा मिळाली. श्रेयसनं मला ज्या पद्धतीनं सांगितलं; शशांक, जा आणि प्रत्येक चेंडूवर चौकार किंवा षटकार मार. यामुळं माझा आत्मविश्वास आणखी वाढला. हा एक सांघिक खेळ आहे पण त्या क्षणी निस्वार्थी राहणं कठीण आहे, श्रेयस त्यापैकी एक होता, मी त्याला गेल्या 10-15 वर्षांपासून ओळखतो, तो अजूनही तसाच आहे.'

पंजाबनं रोमांचक सामन्यात केला गुजरातचा पराभव : अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब संघानं 244 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात, गुजरात संघ 5 विकेट गमावल्यानंतर फक्त 232 धावा करु शकला आणि सामना 11 धावांनी गमावला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाबाद 97 धावा केल्या. तर गुजरातकडून साई सुदर्शननं 74 धावांची खेळी केली.

हेही वाचा :

  1. ग्लेन मॅक्सवेलनं IPL च्या पहिल्याच चेंडूवर केला विक्रम; रोहितला टाकलं मागे
  2. राजस्थान की कोलकाता... आज विजयाचं खातं कोण उघडेल? अजिक्य रहाणे-रियान परागसमोर कठीण आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.