अहमदाबाद Sai Sudharshan Record : गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शननं आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाज जे करु शकला नाही, ते आता साई सुदर्शननं साध्य केलं आहे. यापूर्वी एबी डिव्हिलियर्सनं फक्त आरसीबीकडून खेळताना असा पराक्रम केला होता. आता साई दुसरा खेळाडू बनला आहे.
Caption is in the image! 😎 pic.twitter.com/BbNM48Risl
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 9, 2025
आक्रमक अर्धशतक : बुधवारी साई सुदर्शननं पुन्हा एकदा त्याच्या संघासाठी एक शानदार खेळी केली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सला सुरुवातीलाच धक्का बसला जेव्हा कर्णधार शुभमन गिल स्वस्तात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. शुभमन गिल फक्त दोन धावा करु शकला, त्यावेळी संघाची धावसंख्या फक्त 14 धावा होती. यानंतर, त्यानं जॉस बटलरसोबत मिळून आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलं. त्यानं यावर्षीच्या आयपीएलमध्ये आपल्या 200 धावाही पूर्ण केले. या वर्षी आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाजही ठरला आहे.
Petitioning to change the definition of consistency to SaiSu! 😎 pic.twitter.com/8xoW3ZZc8F
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 9, 2025
काय केला विक्रम : दरम्यान, जर आपण विक्रमांबद्दल बोललो तर, साई सुदर्शन आयपीएलमध्ये एकाच मैदानावर सलग पाच वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. अहमदाबादमधील याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर, साई सुदर्शननं 2024 मध्ये 50 पेक्षा जास्त धावांचे सलग दोन डाव खेळले. त्यानंतर, या वर्षीही त्यानं त्याच मैदानावर सलग तीन वेळा 50 पेक्षा जास्त धावांच्या खेळी खेळल्या आहेत. यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजांनं हे केलेलं नाही. 2018 ते 2019 या काळात आरसीबीकडून खेळताना एबी डिव्हिलियर्सनंही असाच पराक्रम केला होता. आता कोणीतरी त्याची बरोबरी केली आहे.
Sai Sudharsan has become the first Indian and only the second player after AB de Villiers to score five consecutive 50+ scores at a single venue in IPL history.
— All Cricket Records (@Cric_records45) April 9, 2025
• His last 5 IPL innings at Ahmedabad:
84* (49) vs RCB, 2024
103 (51) vs CSK, 2024
74 (41) vs PBKS, 2025
63 (41) vs… pic.twitter.com/Xgo9tgrwQC
यावर्षी फलंदाजी कशी : साई सुदर्शननं यावर्षी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध 74 धावांची शानदार खेळी केली. यानंतर, त्यानं त्याच ठिकाणी मुंबई इंडियन्सविरुद्ध 63 धावांची शानदार खेळी केली. आरसीबीविरुद्ध तो 49 धावांवर बाद झाला असला तरी हा सामना बेंगळुरूमध्ये खेळला गेला. यानंतर, हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तो फक्त 5 धावा करू शकला. पण तो पुन्हा अहमदाबादला परतताच त्याच्या बॅटमधून धावा येऊ लागल्या. यावरून असं दिसून येतं की साईला त्याचं होमग्राउंड खूप आवडतं. तो इथं खूप धावा करत आहे.
हेही वाचा :