ETV Bharat / sports

राजस्थान की कोलकाता... आज विजयाचं खातं कोण उघडेल? अजिक्य रहाणे-रियान परागसमोर कठीण आव्हान - RR VS KKR LIVE

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या सहाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमनेसामने येणार आहेत.

RR vs KKR Preview
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (ETV Bharat Graphics)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : March 26, 2025 at 9:43 AM IST

2 Min Read

गुवाहाटी RR vs KKR Preview : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आज गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात स्पर्धेतील सहावा सामना खेळवला जाणार आहे. या हंगामात दोघांचाही हा दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला आहे. अशा परिस्थितीत, आज कोलकाता किंवा राजस्थान यापैकी एका संघाला विजयाचं खातं उघडण्याची संधी आहे. हा सामना गुवाहाटी इथं संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नाईट रायडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून 7 विकेट्सनं पराभव झाला, तर राजस्थानचा सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून 44 धावांनी पराभव झाला होता.

कोलकाता संघाची गोलंदाजी कमजोर : दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात आक्रमकता दाखवण्यात अपयशी ठरले. सुनील नरेन वगळता नाईट रायडर्सचा कोणताही गोलंदाज आरसीबीच्या फलंदाजांना रोखू शकला नाही. तसंच या सामन्यापूर्वी चांगल्या फॉर्ममध्ये असलेला फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती प्रभाव पाडू न शकणे ही चिंतेची बाब असेल. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर चक्रवर्तीविरुद्ध फिल सॉल्ट आणि विराट कोहलीनं सहज धावा केल्या होत्या. नाईट रायडर्स संघाला आशा आहे की हा फिरकी गोलंदाज गुवाहाटीमध्ये पुनरागमन करण्यात यशस्वी होईल. नाईट रायडर्स पाठीच्या दुखापतीतून सावरत असलेल्या अँरिक नोर्कियाच्या तंदुरुस्तीवरही लक्ष ठेवतील. जर दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज तंदुरुस्त घोषित झाला तर त्याला स्पेन्सर जॉन्सनच्या जागी अंतिम अकरा संघात समाविष्ट केले जाऊ शकते. तसंच फलंदाजीत गेल्या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणे आणि नरेन बाद झाल्यानंतर नाईट रायडर्सचा मधला क्रम कोसळला. वेंकटेश अय्यर आणि आंद्रे रसेल चुकीचे फटके खेळत बाद झाले. संघ व्यवस्थापन आता आशा करेल की तो त्याच्या फटक्यांच्या निवडीमध्ये सावधगिरी बाळगेल.

राजस्थानची गोलंदाजी खूपच कमकुवत : तसंच जर राजस्थान संघाला पुनरागमन करायचं असेल तर त्यांच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. सनरायझर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात, त्यांचा मुख्य वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनं चार षटकांत 76 धावा दिल्या तर फजल हक फारुकी आणि महेश थिक्षणा देखील फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरले. या सर्वांना या सामन्यात परतण्याची संधी मिळेल. राजस्थानचा प्रभारी कर्णधार रियान परागचीही इथं कसोटी लागेल कारण पहिल्या सामन्यात काही निर्णय घेताना तो गोंधळलेल्या स्थितीत दिसला होता.

राजस्थान-कोलकाता दरम्यान हेड-टू-हेड रेकॉर्ड : कोलकाता आणि राजस्थान संघांमध्ये नेहमीच एक रोमांचक लढाई झाली आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 30 आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यात दोन्ही संघांनी समान 14-14 सामने जिंकले आहेत. तर 2 सामने अनिर्णीत राहिले. राजस्थाननं गेल्या 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर एक अनिर्णीत होता.

  • एकूण सामने : 30
  • कोलकाता जिंकले : 14
  • राजस्थान जिंकले : 14
  • निकाल नाही : 2

RR विरुद्ध KKR आयपीएलचा सहावा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स IPL 2025 मधील सहावा सामना 26 मार्च (बुधवार) रोजी गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल, नाणेफेक सायंकाळी 07:00 वाजता होईल.

RR विरुद्ध KKR आयपीएलचा सहावा सामना कुठं आणि कसा पाहायचा?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्क भारतात इंडियन प्रीमियर लीग 2025 चं अधिकृत प्रसारण करणार आहे. जिओ आणि स्टार स्पोर्ट्स इंडियाच्या विलीनीकरणानंतर, दर्शक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर आयपीएल सामने पाहू शकतात. याव्यतिरिक्त, ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी JioHotstar ॲपवर फ्रीमध्ये थेट उपलब्ध असेल, जेथे चाहते मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात.

हेही वाचा :

  1. ना धोनी, ना रोहित, ना कोहली... निकोलस पूरननं T20 क्रिकेटमध्ये केला अद्भुत विक्रम
  2. कोण आहे दिल्लीचा 'शर्माजी का बेटा'? ज्यानं लखनऊच्या जबड्यातून हिसकावला विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.