ETV Bharat / sports

MCA कडून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह शरद पवारांचा खास सन्मान... - WANKHEDE STADIUM

मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे क्रिकेट स्टेडियमधील स्टॅन्डला तीन जणांची नावं देण्याचा निर्णय एमसीएच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला.

Wankhede Stadium
वानखेडे क्रिकेट स्टेडियम (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 16, 2025 at 11:24 AM IST

Updated : April 16, 2025 at 12:35 PM IST

1 Min Read

मुंबई Wankhede Stadium : मुंबई क्रिकेट विश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची सर्वसाधारण मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, ऐतिहासिक वानखेडे क्रिकेट स्टेडियमधील स्टॅन्डला तीन जणांची नावं देण्याचा निर्णय एमसीएच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. या तिघांमध्ये दोन क्रिकेटपटू तर एक राजकीय नेत्याचा समावेश आहे.

कोणाची नावं देणार : स्टेडियमधील स्टॅन्डला देण्यात येणाऱ्या तीन नावांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार तसंच ज्यानं आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली होती, असा क्रिकेटपटू रोहित शर्मा, दुसरे नाव म्हणजे माजी कसोटीपटू अजित वाडेकर यांच्यासह सध्याच्या घडीला देशातील सर्वात अनुभवी राजकीय नेते शरद पवार या तिघांचं वानखेडे स्टडीमधील स्टॅन्डला नाव देण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, ग्रँड स्टँड लेवल 4 ला अजित वाडेकर यांचं नाव देण्यात येणार, ग्रँड स्टँड लेवल 3 स्टँडला शरद पवारांचं नाव दिलं जाईल. तर दिवेचा पॅवेलियन लेवल 3 ला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचं नाव देण्यात येणार आहे. याबाबत मिलिंद नार्वेकरांनी प्रस्ताव मांडला होता, तर जितेंद्र आव्हाडांनी याला अनुमोदन दिलं.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक (ETV Bharat Reporter)

पुढच्या पिढीला इतिहास समजावा : या निर्णयांबाबत बोलताना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितलं की, "आजच्या बैठकीत स्टेडियमधील स्टॅन्डला तीन जणांची नावं देण्याचा आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसंच एमसीएचा बॉक्स आहे, त्या बॉक्सला एमसीएचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अमोल काळे यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएमधील इतिहास आणि क्रिकेटची माहिती येणाऱ्या भावी पिढीला देखील समजावी. यासाठी एमसीएचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही हा आजच्या सर्वसाधारण बैठकीत एकमतानं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे."

हेही वाचा :

  1. मराठी माणसाचा अपमान अन् 13 महिन्यांत उभारलं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम
  2. वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण; सचिन, रोहित, रवी शास्त्रींनी स्टेडियमवरील आठवणींना दिला उजाळा
  3. सचिन ते गावस्कर... वानखेडे स्टेडियमच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक दिग्गज क्रिकेटपटू राहणार हजर

Last Updated : April 16, 2025 at 12:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.