ETV Bharat / sports

'चल आपण आईस्क्रीम खायला जाऊ', रोहितनं पत्नी रितिकाला 'असं' केलं होतं प्रपोज; पाहा व्हिडिओ

टीम इंडियाचा वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मानं पत्नी रितिका सजदेहला कशा पद्धतीनं लग्नाचा प्रस्ताव दिल्याचं उघड केलं आहे.

Rohit Sharma Love Story
रोहित शर्मा (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : June 22, 2025 at 3:47 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई Rohit Sharma Love Story : टीम इंडियाचा वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मानं पत्नी रितिका सजदेहला कशा पद्धतीनं लग्नाचा प्रस्ताव दिल्याचं उघड केलं आहे. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि त्यांची पत्नी गीता बसरा यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यानं हा किस्सा सांगितला. विशेष म्हणजे यावेळी त्यांची पत्नीही उपस्थित होती. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Rohit Sharma Love Story
रोहित शर्मा (IANS Photo)

काय म्हणाला रोहित शर्मा : रोहितनं यावेळी बोलताना म्हणाला की त्यानं रितिकाला सांगितलं की ते आईस्क्रीम खाणार आहे, पण प्रत्यक्षात तो तिला बोरिवली इथं असलेल्या त्याच्या बालपणीच्या क्रिकेट मैदानावर घेऊन गेला. तिथे पोहोचल्यानंतर, खेळपट्टीच्या मध्यभागी, त्यानं गुडघ्यावर बसून रितिकाला प्रपोज केलं. रोहित म्हणाला, "मी तिला सांगितलं, चल आपण जाऊन आईस्क्रीम खाऊ. आम्ही मरीन ड्राइव्हहून निघालो, हाजी अली, वरळी मार्गे गेलो आणि वांद्रे ओलांडलं. रितिकाकडे त्या बाजूची फारशी माहिती नव्हती. मी म्हणालो बोरिवलीत एक चांगलं दुकान आहे, चल तिथं जाऊया." यावेळी रोहित पुढं म्हणाला की त्यानं, आधीच त्याच्या एका मित्राला मैदानावर बोलावलं होतं, जो तो खास क्षण कॅमेऱ्यात कैद करु शकला.

कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून घेतली निवृत्ती : रोहित शर्मा म्हणाला की, "जेव्हा आम्ही मैदानावर पोहोचलो तेव्हा तिथं अंधार होता. रितिकाला हे क्रिकेटचं मैदान आहे हेही माहित नव्हतं. गाडी पार्क केल्यानंतर, मी मैदानाच्या मध्यभागी गेलो आणि गुडघ्यावर बसून प्रपोज केलं." रोहित शर्मानं 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि मे 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली.

कसोटी क्रिकेट कारकिर्द कशी : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मानं 7 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहित शर्मानं 2013 मध्ये भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं त्याच्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये शतकंही केली. परदेश दौऱ्यांवरील त्याची कामगिरी कसोटी क्रिकेटइतकी प्रभावी राहिलेली नाही. याच कारणास्तव, तो संघातून आत-बाहेर जात राहिला.

24 सामन्यात भूषवलं कर्णधारपद : आतापर्यंत त्यानं भारतीय संघासाठी 67 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 4301 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्यानं 12 शतकं आणि 18 अर्धशतके झळकावली आहेत. रोहित शर्मानं 24 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं. त्यापैकी भारतानं 12 जिंकले आणि 9 गमावले. याशिवाय तीन कसोटी सामनेही अनिर्णित राहिले. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवांमुळं त्याच्या कर्णधारपदावर पडदा पडला.

हेही वाचा :

  1. हेडिंग्लेमध्ये 'ऋषभ' वादळ...! 251 मिनिटांच्या खेळीत बदलला 148 वर्षांचा इतिहास; छापलं नवं 'रेकॉर्ड बुक'
  2. फुटकं नशीब...! 3006 दिवसांचं स्वप्न, साहेबांविरुद्ध फक्त 13 मिनिटांत भंग