चेन्नई Rohit Sharma : आयपीएल 2025 मध्ये, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात 23 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात चेन्नईनं मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सनं पराभव केला आणि स्पर्धेत विजयानं आपल्या मोहिमेची सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सना 20 षटकांत 9 गडी गमावून फक्त 155 धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल, चेन्नईनं 19.1 षटकांत 6 गडी गमावून सामना जिंकला.
The men in 💛 take home the honours! 💪
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
A classic clash in Chennai ends in the favour of #CSK ✨
Scorecard ▶ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL pic.twitter.com/ZGPkkmsRHe
रोहितनं केला मोठा विक्रम : चेन्नईच्या गोलंदाजीसमोर मुंबईचे फलंदाज असहाय्य दिसत होते. फक्त तिलक वर्मा 30 पेक्षा जास्त धावा करु शकला. सलामीवीर रोहित शर्माला खातंही उघडता आलं नाही. रोहित शर्मा फक्त 4 चेंडूंचा सामना करु शकला. पहिल्याच षटकात तो खलील अहमदचा बळी ठरला. मात्र शून्यावर बाद होऊनही, रोहितनं एक मोठा विक्रम रचण्यात यश मिळवलं. हिटमननं 23 मार्च रोजी आयपीएलमध्ये त्याचा 258 वा सामना खेळला. अशाप्रकारे, तो आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला. दिनेश कार्तिकला मागे टाकत त्यानं ही मोठी कामगिरी केली.
दिनेश कार्तिकला टाकलं मागे : आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. 2008 पासून आयपीएल खेळत असलेल्या धोनीनं आतापर्यंत 265 सामने खेळले आहेत. यात त्याच्या बॅटमधून 5 हजारांहून अधिक धावा झाल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर आता रोहित शर्मा आहे तर दिनेश कार्तिक तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. कोहलीच्या नावावर 253 आयपीएल सामने आहेत. यानंतर, रवींद्र जडेजा 241 आयपीएल सामन्यांसह पाचव्या स्थानावर आहे.
Most matches played in IPL
— All Cricket Records (@Cric_records45) March 23, 2025
265 - MS Dhoni
258* : Rohit Sharma
257 - Dinesh Karthik
253 - Virat Kohli
241 - Ravindra Jadeja pic.twitter.com/vDGLWll00g
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू :
- महेंद्रसिंग धोनी : 265*
- रोहित शर्मा : 258*
- दिनेश कार्तिक : 257
- विराट कोहली : 253*
- रवींद्र जडेजा : 241*
- शिखर धवन : 222
रोहितची आणखी एका विक्रमावर नजर :
मुंबई इंडियन्स आता त्यांचा दुसरा सामना 29 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळेल. या सामन्यात चौकार मारुन रोहित एक मोठा विक्रम रचेल. भारतीय कर्णधाराला आयपीएलमध्ये 600 चौकार पूर्ण करण्यासाठी फक्त एका चौकाराची आवश्यकता आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरेल.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज :
- शिखर धवन : 768
- विराट कोहली : 709*
- डेव्हिड वॉर्नर : 663
- रोहित शर्मा : 599*
हेही वाचा :