Bihar Election Results 2025

ETV Bharat / sports

क्रिकेटपटू रिंकू सिंहला डी-कंपनीकडून धमकी; दोन आरोपींना अटक

टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीकडून धमकी मिळल्याचं समोर आलं आहे. यानंतर एकच खळबळ उडाली.

Extortion Threat to Rinku Singh
रिंकू सिंह (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : October 9, 2025 at 5:18 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई Extortion Threat to Rinku Singh : बॉलिवूडनंतर आता अंडरवर्ल्डचं सावट क्रिकेट जगतावरही दिसून येत आहे. टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीकडून धमकी मिळल्याचं समोर आलंय. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र या प्रकरणामुळं क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्ररकरण काय : क्रिकेटपटू रिंकू सिंहला 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली होती. रिंकूच्या मोबाईलवर 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7:57 वाजता धमकीचा पहिला संदेश आला होता. त्यात लिहिलं होतं की, "आशा आहे तुम्ही ठीक असाल. मी तुमचा सर्वात मोठा चाहता आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही केकेआर संघाकडून आयपीएल खेळता. रिंकू सर, मला खात्री आहे की एक दिवस तुम्ही कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचाल. साहेब, एक विनंती जर तुम्ही थोडी आर्थिक मदत करु शकलात, तर अल्लाह तुम्हाला आणखी बरकत देईल, इंशाअल्लाह." रिंकूनं या संदेशाला फारसं महत्व न देता कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर 9 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:56 वाजता रिंकू सिंगला दुसरा संदेश आला. "मला 5 कोटी रुपये हवेत. वेळ आणि ठिकाण मी ठरवीन." या दुसऱ्या धमकीच्या मेसजलाही रिंकूनं उत्तर दिलं नाही. त्यानंतर 20 एप्रिलला सकाळी 7:41 वाजता इंग्रजीत आणखी एक संदेश आला की, 'Reminder! D-Company.'

खंडणीचं बाबा सिद्धिकींच्या केससोबत कनेक्शन : दिवंगत एनसीपी नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे पूत्र तथा माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना धमकी देणारा आरोपी मोहम्मद दिलशाद नौशादनंच रिंकूला धमकी दिल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोन्ही प्रकरणात नौशादनं स्वत:ला डी-कंपनीशी जोडून धमकी देत खंडणी मागितली होती. नौशाद हा मूळचा बिहारमधील दरभंगा जिल्ह्याचा रहिवासी असून 28 एप्रिल रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आधी त्याला लुकआउट नोटीस (LOC) बजावण्यात आली आणि त्यानंतर त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी झाली होती. त्यानंतर अखेर कॅरेबियन बेटांवर तो असल्याची माहिती मिळताच, त्रिनिदाद आणि टोबॅगोहून त्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं.

मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरु : गुन्हे शाखेच्या दाव्यानुसार फेब्रुवारी ते एप्रिल 2025 दरम्यान अंडरवर्ल्डकडून रिंकू सिंह आणि त्याच्या टीमला धमकीचे तीन संदेश पाठवण्यात आले आहे. या धमक्यांमधून रिंकूकडून 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली असून यात तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याचं समोर आलं असून या खंडणीमागील खरा सूत्रधार कोण? आहे याचा तपास सध्या सुरु आहे.

चौकार मारत जिंकवला आशिया चषक : रिंकू सिंह हा टीम इंडियातील एक फिनिशर क्रिकेटपटू आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात केवळ एक बॉल खेळणं त्याच्या वाट्याला आलं होतं. त्यावर त्यानं विजयी चौकार मारुन आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आयपीएलमध्ये रिंकू शाहरुख खानच्या केकेआरचं प्रतिनिधीत्व करतो. रिंकूचं लग्न जौनपूरमधील मछलीशहर लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रिया सरोजशी ठरलं आहे. नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला. प्रिया ही समाजवादी पार्टीची खासदार असून आणि तिचे वडील अनेक वर्ष आमदार राहिले होते.


हेही वाचा :

  1. प्रसिद्ध IN, बुमराह OUT; दुसऱ्या कसोटीसाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11?
  2. रशीद खानचा मोठा कारनामा; 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच आशियाई गोलंदाज
  3. टीम इंडिया विजयी हॅटट्रिक करत अव्वल स्थानावर कब्जा करणार? कसं असेल हवामान, वाचा