ETV Bharat / sports

RCB घरच्या मैदानावर पहिला सामना जिंकत पराभवाची मालिका खंडित करणार? - RCB VS PBKS MATCH 34

इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामातील 34व्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.

RCB vs PBKS Match
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 18, 2025 at 9:39 AM IST

2 Min Read

बंगळुरु RCB vs PBKS Match : इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामातील 34व्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 18 एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता बेंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.

दोन्ही संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वात : या हंगामात आरसीबी आणि पंजाब दोन्ही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळत आहेत. यात त्यांची कामगिरी आतापर्यंत खूपच चांगली राहिली आहे. आरसीबी संघ 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर पंजाब किंग्जचेही 8 गुण आहेत आणि ते चौथ्या क्रमांकावर आहेत. अशा परिस्थितीत या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरु शकतो याकडे सर्वांचं लक्ष असेल. त्यातच आरसीबीनं या हंगामात घरच्या मैदानावर म्हणजेच बेंगळुरुमध्ये दोन सामने जिंकले आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळं आता आरसीबी घरच्या मैदानावर हंगामातील पहिला सामना जिंकणार का हे पाहावं लागेल.

विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष : या सामन्याचा निकाल मुख्यत्वं 2 खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असेल, ज्यात विराट कोहलीची बॅट चांगली कामगिरी करणं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी खूप महत्त्वाचं असेल. जर कोहलीनं या सामन्यात मोठी खेळी केली तर आरसीबीला सामन्यात विजय मिळवणं थोडं सोपं होऊ शकतं. कोहलीनं आतापर्यंत पंजाब किंग्जविरुद्ध 32 सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं सुमारे 35 च्या सरासरीनं 1030 धावा केल्या आहेत आणि यामध्ये 5 अर्धशतकांसह एका शतकाचा समावेश आहे. दुसरीकडे, जर आपण श्रेयस अय्यरबद्दल बोललो तर, त्याची बॅट आरसीबीविरुद्ध चांगली चालत असल्याचं दिसून आलं आहे. अय्यरनं आरसीबीविरुद्ध 14 सामन्यांमध्ये 30.23 च्या सरासरीनं 393 धावा केल्या आहेत, तर त्यानं 4 अर्धशतकी खेळी देखील खेळल्या आहेत.

चिन्नास्वामी स्टेडियमचा खेळपट्टी अहवाल : आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना बेंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल, जिथं खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली मानली जाते. लहान मैदानामुळं, फलंदाजांना इथं मोठे फटके खेळणं थोडं सोपं वाटतं. मात्र या हंगामात आतापर्यंत इथं खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा करणं थोडं कठीण झालं आहे, त्यामुळं नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आयपीएलमध्ये चिन्नास्वामीचा पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे 171 धावा आहे.

किती सामने झाले : आतापर्यंत एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 97 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 41 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं 52 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात नाणेफेक खूप महत्त्वाची भूमिका बजावेल कारण दुसऱ्या डावात दव पडल्यामुळं धावा करणं सोपं होईल.

कसा आहे दोन्ही संघांचा विक्रम : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघांमध्ये जवळजवळ समान असल्याचं दिसून येतं. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये स्पर्धा दिसून येते. दोन्ही संघ आतापर्यंत 33 आयपीएल सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. या दरम्यान पंजाब किंग्जनं 17 वेळा विजय मिळवला आहे. तर, आरसीबीनं 16 सामने जिंकले आहेत. मात्र गेल्या 5 सामन्यांपैकी आरसीबीनं 3 सामने जिंकले आहेत तर पंजाबनं 2 सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, लियाम लिव्हिंगस्टोन, क्रुणाल पंड्या, यश दयाल, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार.

इम्पॅक्ट प्लेअर : सुयश शर्मा

पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

इम्पॅक्ट प्लेअर : सूर्यांश शेडगे

हेही वाचा :

  1. मुंबई पलटणचा 'ऑरेंज आर्मी'विरुद्ध दणक्यात विजय... SRH चा पराभवाचा 'पंचहार'
  2. MI vs SRH सामन्यात 300 धावा होतील... हैदराबादच्याच माजी दिग्गज गोलंदाजानं केलं भाकीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.