हैदराबाद Change in RCB Squad : आयपीएल 2025 च्या हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं लीग टप्प्यातील 12 पैकी 8 सामने जिंकून प्लेऑफसाठी आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. आरसीबी आता लीग स्टेज टॉप-2 मध्ये संपवण्याचं लक्ष्य ठेवून आहे जेणेकरुन त्यांना क्वालिफायर-1 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. दरम्यान, आरसीबीनं प्लेऑफपूर्वी आणखी एका बदलीची घोषणा केली आहे, ज्यामध्ये त्यांनी न्यूझीलंडचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज टिम सायफर्टला त्यांच्या संघाचा भाग बनवलं आहे.
When firepower meets form, we get an absolutely destructive combo. 🔥
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 22, 2025
Tim's ready to take off, and WE. CAN. NOT. WAIT! 🙌#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/OFQ2j1qb8R
टिम सायफर्ट हे जेकब बेथेलची जागा घेतील : आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित केल्यानंतर, 17 मे रोजी सामने पुन्हा सुरु झाले ज्यामध्ये उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक पुन्हा जाहीर करण्यात आलं. त्याच वेळी, संघांना अनेक खेळाडूंच्या उपलब्धतेबाबतही समस्या येत आहेत. दरम्यान, आरसीबीनं आता जेकब बेथेलच्या जागी एका खेळाडूची निवड केली आहे जो लीग स्टेज सामने संपल्यानंतर राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी इंग्लंडला परतणार आहे. टिम सायफर्टला 2 कोटी रुपयांना आरसीबी संघाचा भाग बनवण्यात आलं आहे. सायफर्टनं यापूर्वी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये खेळलं आहे, तीन सामन्यांमध्ये त्यानं एकूण 26 धावा केल्या आहेत.
🔊 𝑶𝑭𝑭𝑰𝑪𝑰𝑨𝑳 𝑨𝑵𝑵𝑶𝑼𝑵𝑪𝑬𝑴𝑬𝑵𝑻 🔊
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 22, 2025
New Zealand's explosive wicketkeeper batter, Tim Seifert, has been named as RCB’s temporary replacement for Jacob Bethell, who returns to England for national duties after our SRH match. 🙌
Welcome to #ನಮ್ಮRCB, Bam Bam! 🤩… pic.twitter.com/4TuFJdUHpY
टिम सायफर्टचा टी-20 मध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड : जर आपण न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज टिम सायफर्टचा टी-20 क्रिकेटमधील विक्रम पाहिला तर त्यानं आतापर्यंत 262 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 27.65 च्या सरासरीनं 5862 धावा केल्या आहेत. यात सायफर्टच्या बॅटमधून तीन शतकं आणि 28 अर्धशतकांच्या खेळी पाहायला मिळाल्या आहेत. सायफर्टचा टी-20 मध्ये स्ट्राईक रेट 133.07 आहे. सायफर्ट सध्या पीएसएलमध्ये कराची किंग्जकडून खेळत आहे आणि आरसीबीच्या शेवटच्या लीग सामन्यासाठी तो संघात सामील होण्याची अपेक्षा आहे.
आरसीबीला पहिल्या दोनमध्ये जाण्याची संधी : जर आरसीबीनं पुढील दोन्ही सामने जिंकले तर त्यांचं स्थान पहिल्या दोनमध्ये निश्चित होईल. दरम्यान, आरसीबीचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध असेल. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला हैदराबाद संघ आरसीबीविरुद्ध शेवटचा सामना खेळून 18व्या हंगामातून विजयी निरोप घेण्याचा प्रयत्न करेल. विशेष म्हणजे या हंगामात आरसीबी हैदराबादविरुद्ध खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हेही वाचा :