चेन्नई Jadeja Give 9 Runs : आयपीएल 2025 मध्ये, चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाज आणि फलंदाज कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चांगली कामगिरी करु शकले नाहीत आणि ते मोठे अपयशी ठरले. खेळाडूंच्या खराब फॉर्मची किंमत संघाला 8 विकेट्सनं सामना गमावून चुकवावी लागली. चालू हंगामात सीएसकेचा हा सलग पाचवा पराभव आहे. प्रथम फलंदाजी करताना, चेन्नईनं कसा तरी 100 धावांचा टप्पा ओलांडला आणि 103 धावा केल्या. यानंतर, केकेआरनं 10.1 षटकांत हे लक्ष्य गाठलं. या सामन्यात रवींद्र जडेजानं फक्त एक चेंडू गोलंदाजी केली आणि 9 धावा दिल्या.
🚨 Milestone 🚨
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2025
The impressive Rinku Singh hits the 1️⃣0️⃣0️⃣0️⃣-run landmark in #TATAIPL 👏
He finished the game with a 6️⃣ 💪
Updates ▶ https://t.co/gPLIYGimQn#CSKvKKR | @rinkusingh235 pic.twitter.com/Y0CkZVP0im
जडेजानं एका चेंडूत दिल्या 9 धावा : या सामन्यात, रवींद्र जडेजानं चेन्नई सुपर किंग्जकडून 11वं षटक टाकलं, तर रिंकू सिंग कोलकाता नाईट रायडर्सकडून क्रीजवर फलंदाजी करत होता. या षटकातील पहिला चेंडू नो बॉल होता, ज्यावर रिंकूनं धावत जाऊन दोन धावा पूर्ण केल्या. यानंतर जडेजानं षटकातील पहिला कायदेशीर चेंडू टाकला. त्यावर रिंकूनं षटकार मारला आणि केकेआरला विजय मिळवून दिला आणि सामना संपला. परिणामी जडेजानं संपूर्ण सामन्यात फक्त एकच चेंडू टाकला पण एकूण 9 धावा दिल्या.
🚨 CSK LOSE 5 CONSECUTIVE MATCHES FOR THE FIRST TIME IN IPL HISTORY. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2025
- KKR chase down 104 in just 10.1 overs. pic.twitter.com/t6gb3jVMGj
रिंकू सिंगनं आयपीएलमध्ये केल्या 1000 धावा पूर्ण : जेव्हा केकेआरचा फलंदाज रिंकू सिंगनं रवींद्र जडेजाच्या नो बॉलवर धावत जाऊन दोन धावा घेतल्या तेव्हा त्यानं आयपीएलमधील आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या आणि ही खास कामगिरी केली. रिंकू 2018 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत तो आयपीएलचे सर्व हंगाम फक्त केकेआरसाठी खेळला आहे. त्यानं 52 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 1007 धावा केल्या आहेत, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे.
Even MS DHONI is using Ashwin in Powerplay, I think people were too harsh on Ruturaj Gaikwad. pic.twitter.com/wiQsRfu9T6
— Johns. (@CricCrazyJohns) April 11, 2025
चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाज अपयशी : केकेआर विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद स्वीकारलं. पण त्याच्या नेतृत्वाखालीही संघाचं नशीब बदललं नाही. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाज मोठे अपयशी ठरले. शिवम दुबेनं सर्वाधिक 31 धावा केल्या. विजय शंकरनं 29 धावांचं योगदान दिलं. मोठ्या अडचणीनं संघ 103 धावांपर्यंत पोहोचू शकला. यानंतर, सुनील नरीनच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर केकेआरनं लक्ष्याचा सहज पाठलाग केला. नरीननं 18 चेंडूत 44 धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. त्याच्या व्यतिरिक्त रहाणेनं 20 धावांचं योगदान दिलं.
हेही वाचा :