न्यू चंदिगड PBKS vs KKR : आयपीएल 2025 च्या 31 व्या सामन्यात, पंजाब किंग्ज म्हणजेच PBKS संघानं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चमत्कार केला. पंजाबनं एका रोमांचक कमी धावसंख्येच्या सामन्यात कोलकात्याचा 16 धावांनी पराभव करुन नवा इतिहास रचला.
𝙏𝙃𝙄𝙎. 𝙄𝙎. 𝘾𝙄𝙉𝙀𝙈𝘼 🎬#PBKS have pulled off one of the greatest thrillers in #TATAIPL history 😮
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2025
Scorecard ▶️ https://t.co/sZtJIQpcbx#PBKSvKKR | @PunjabKingsIPL pic.twitter.com/vYY6rX8TdG
पंजाबचे फलंदाज अपयशी : या सामन्यात यजमान पंजाब संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्यांचा डाव फक्त 111 धावांवर संपला. पंजाबचा एकही फलंदाज सातत्यपूर्ण खेळू शकला नाही. प्रभसिमरननं सर्वाधिक 30 धावांचं योगदान दिलं. तर कोलकाताकडून हर्षित राणानं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
Wickets, Nerves, Wizardry 🔮
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2025
Yuzvendra Chahal rightfully bags the Player of the Match after a clutch performance in one of #TATAIPL's greatest encounters 🕸️
Scorecard ▶️ https://t.co/sZtJIQpcbx#PBKSvKKR | @PunjabKingsIPL | @yuzi_chahal pic.twitter.com/PnQRDQUMmA
कोलकाताचा डाव कोसळला : पंजाबच्या 111 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता संघ 15.1 षटकात अवघ्या 95 धावांवर ऑलआउट झाला. अशाप्रकारे, पंजाबनं आयपीएलमधील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा मोठा पराक्रम केला. याआधी आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर होता. 2009 च्या आयपीएलमध्ये सीएसकेनं 116/9 धावांचा बचाव केला होता. आता पंजाबनं सीएसकेचा हा विक्रम मोडला आहे.
Every player got out — 20 wickets fell in an IPL match.
— All Cricket Records (@Cric_records45) April 15, 2025
DCG vs RR at Nagpur 2010
KKR vs RCB at Kolkata 2017
MI vs SRH at Wankhede 2018
MI vs KKR at Wankhede 2024
PBKS vs KKR at Mullanpur 2025* pic.twitter.com/6mQGxVtQGf
चहलच्या जाळ्यात अडकले केकेआरचे फलंदाज : पंजाबच्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकात्याचे फलंदाजही संघर्ष करताना दिसले. कोलकात्याचे सलामीवीर सुनील नारायण आणि क्विंटन डी कॉक पहिल्या दोन षटकांतच बाद झाले. यानंतर, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी जबाबदारी सांभाळली आणि धावसंख्या 62 धावांपर्यंत नेली. यानंतर पंजाबचा फिरकीपटू चहलने आपल्या फिरकी जादूचा वापर करत रहाणे आणि रघुवंशीला त्याच्या सलग दोन षटकांत बाद केले. यानंतर, 11व्या षटकात वेंकटेश अय्यर मॅक्सवेलचा बळी ठरला. कोलकाताचा अर्धा संघ 74 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
PUNJAB KINGS HAS DEFENDED THE LOWEST TOTAL IN IPL HISTORY
— All Cricket Records (@Cric_records45) April 15, 2025
Lowest total defended in IPL
111 by PBKS v KKR, 2025*
116 by CSK v PBKS, 2009
118 by SRH v MI, 2018
119 by PBKS v MI, 2009
119 by SRH v PWI, 2013
120 by MI v PWI, 2012
125 by PBKS v SRH, 2021 pic.twitter.com/6UETK5sxX7
रघुवंशीच्या सर्वाधिक धावा : मॅक्सवेलनंतर 12व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या चहलने रिंकू सिंग आणि रमनदीप सिंग यांना सलग चेंडूंवर बाद करुन कोलकाताला बॅकफूटवर आणले. यानंतर मार्को जानसेननं हर्षित राणाला बाद करुन पंजाबच्या विजयाच्या आशा उंचावल्या. वैभव अरोराच्या रूपानं कोलकात्याला नववा धक्का बसला. यानंतर, आंद्रे रसेलनं काही मोठे फटके खेळून सामना आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी मार्को जॅन्सननं शेवटचा बळी घेतला आणि पंजाबला रोमांचक विजय मिळवून दिला. कोलकाताकडून आंग्रिश रघुवंशीनं सर्वाधिक 37 धावा केल्या. रघुवंशीने त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार मारला. पंजाबकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मार्को जॅन्सेननं 3 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा :