ETV Bharat / sports

एक निशाणा चुकला अन् मनू भाकरची ऐतिहासिक 'मेडल हॅटट्रिक' हुकली - Paris Olympics 2024

Paris Olympics 2024 Shooting : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दोनवेळा कांस्यपदकावर नाव कोरणाऱ्या मनू भाकरला तिसऱ्या पदकानं थोडक्यात हुलकावणी दिली.

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 3, 2024, 1:30 PM IST

Updated : Aug 3, 2024, 2:28 PM IST

Paris Olympics 2024 Shooting
मनू भाकर (AP Photo)

पॅरिस Paris Olympics 2024 Shooting : भारताची स्टार नेमबाज मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यात थोडक्यात चुकली आहे. मनूनं शनिवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 25 मीटर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चौथं स्थान पटकावलं. या स्पर्धेत तिनं पदक पटकावलं असतं तर एका ऑलिम्पिकमध्ये 3 पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली असती. तथापि, मनू भाकेरनं पॅरिसमधील 10 मीटर एअर पिस्तूल महिला एकेरी आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक या दोन्ही प्रकारात कांस्यपदकं जिंकली आहेत.

मनू भाकरची पदकाची हॅट्ट्रिक हुकली : नेमबाज मनू भाकरनं शनिवारी महिलांच्या 25 मीटर पिस्तूलच्या अंतिम फेरीत एकूण 28 गुणांसह चौथं स्थान पटकावलं आणि पोडियमवरील स्थान थोडक्यात हुकलं. युवा ऑलिम्पिक चॅम्पियन भाकर पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या स्थानावर राहिली. त्यानंतर 7 वी सिरीज संपेपर्यंत ती पदक जिंकण्याच्या स्थितीत होती.

8 व्या शूट-ऑफ सिरीजमध्ये हरली : 8 व्या सिरीजमध्ये तिच्या पाच पैकी फक्त दोन शॉट्स (10.2 किंवा त्याहून अधिक स्कोअर) बदलल्यानंतर, भाकर टॉप-3 मध्ये राहण्यासाठी शूट-ऑफमध्ये गेली. या सिरीजमध्ये तिनं हंगेरियन नेमबाज वेरोनिका मेजरला मागे टाकत कांस्यपदकावर कब्जा केला.

कोरियानं जिंकलं सुवर्णपदक : महिलांच्या 25 मीटर पिस्तूलच्या अंतिम फेरीत कोरियाच्या यांग जिननं 37 गुणांसह सुवर्णपदक जिंकलं. त्याचवेळी यजमान फ्रान्सची नेमबाज कॅमिल जेड्रझेजेव्स्की हिला 10 व्या सिरीजनंतर शूट ऑफनंतर रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

नेमबाजीत भारताचे पदक विजेते :

  • राज्यवर्धन सिंह राठोड : रौप्यपदक, अथेन्स ऑलिम्पिक (2004)
  • अभिनव बिंद्रा : सुवर्णपदक, बीजिंग ऑलिम्पिक (2008)
  • गगन नारंग : कांस्यपदक, लंडन ऑलिम्पिक (2012)
  • विजय कुमार : रौप्यपदक, लंडन ऑलिम्पिक (2012)
  • मनु भाकर : कांस्यपदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)
  • मनु भाकर-सरबजोत सिंग : कांस्यपदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)
  • स्वप्निल कुसाळे : कांस्यपदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)

हेही वाचा :

  1. भारतीय तिरंदाजांचे 'तीर' भरकटले; चौथ्या कांस्यपदकाची थोडक्यात हुलकावणी - Paris Olympics 2024
  2. पी.व्ही.सिंधूचं पदकांच्या हॅट्रिकचं स्वप्न भंगलं; मनू भाकर आज पुन्हा लावणार 'निशाणा'; सातव्या दिवशी 'हे' दिग्गज दिसणार मैदानात - Paris Olympic 2024

Last Updated : Aug 3, 2024, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.