ETV Bharat / sports

भारतीयांचा हार्ट ब्रेक...! स्टार शटलर लक्ष्य सेन कांस्यपदक सामन्यात पराभूत - Paris Olympics 2024

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 5, 2024, 7:20 PM IST

Updated : Aug 5, 2024, 7:29 PM IST

Paris Olympics 2024 Badminton : भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेनला बॅडमिंटन पुरुष एकेरीत कांस्यपदक सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय.

lakshya sen
लक्ष्य सेन (AP Photo)

पॅरिस Paris Olympics 2024 Badminton : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला आणखी एक पदकानं हुलकावणी दिली. कारण भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेन बॅडमिंटन लक्ष्य सेन इतिहास रचण्यात चुकला : भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेन इतिहास रचण्यात चुकला. सेननं आज पदक जिंकलं असतं तर बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो भारतासाठी पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला असता. 22 वर्षीय लक्ष्य सेनचं हे पहिलेच ऑलिम्पिक आहे आणि त्यानं आपल्या पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठून दमदार कामगिरी केली आहे.

पहिल्या सेटमध्ये चमकदार कामगिरी : भारताचा युवा स्टार लक्ष्य सेन सुरुवातीपासूनच त्याच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा वरचढ दिसत होता. सामन्याच्या सुरुवातीपासूनच लक्ष्यनं आक्रमक खेळाचं प्रदर्शन करत मध्यांतरापर्यंत 11-7 अशी आघाडी घेतली. सेनच्या आक्रमाणाला ली जी जियाकडे उत्तर नव्हतं. सेननं आपला शानदार खेळ सुरु ठेवत पहिला सेट 21-13 असा सहज जिंकला.

दुसरा सेट रोमांचक : दोन्ही खेळाडूंमधील दुसरा सेट खूपच रोमांचक झाला. सेननं या सेटची सुरुवात उत्तम शैलीत केली. पण उपांत्य फेरीप्रमाणेच तो नंतर गारद झाला. लक्ष्याला सुरुवातीची आघाडी मिळाली पण मलेशियाच्या खेळाडूनं जोरदार पुनरागमन करत मध्यांतरापर्यंत 11-8 अशी आघाडी घेत 3 गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. यानंतर सेननं पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण मलेशियाच्या खेळाडूनं त्याला फारशी संधी दिली नाही आणि दुसरा सेट 21-16 असा जिंकला.

तिसऱ्या सेटमध्ये चुरशीची लढत : भारताचा लक्ष्य सेन आणि मलेशियाचा ली जी जिया यांच्यात तिसऱ्या सेटमध्ये चुरशीची लढत झाली. लक्ष्याच्या उजव्या हाताला दुखत असल्यानं मलेशियाचा खेळाडू या सेटमध्ये लक्ष्य सेनपेक्षा वरचढ असल्याचं दिसून आलं. वेदना होत असतानाही लक्ष्यनं हिंमत गमावली नाही आणि लढा सुरुच ठेवला. पण, भारतासाठी पदक जिंकण्यासाठी त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. मलेशियाच्या ली जी जियानं तिसरा सेट 21-11 असा जिंकून कांस्यपदकावर कब्जा केला.

उपांत्य फेरीत ऑलिम्पिक चॅम्पियनकडून पराभूत : याआधी युवा शटलर लक्ष्य सेनला बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. चुरशीच्या लढतीत व्हिक्टरनं लक्ष्यचा 22-20, 21-14 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. पराभवानंतरही बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत खेळणारा तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला.

हेही वाचा :

  1. भारतीय महिला टेबल टेनिस संघानं रचला इतिहास; रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक - Paris Olympics 2024
  2. अनंतजीत आणि महेश्वरीला कांस्यपदकाची हुलकावणी; अवघ्या एका गुणानं पराभूत - Paris Olympics 2024

Last Updated : Aug 5, 2024, 7:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.