नवी दिल्ली Shoaib Akhtar Channel Banned : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या भयानक हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेत अनेक मोठी पावलं उचलली. ज्यात अटारी बॉर्डर तपासणी नाके बंद करणे, सिंधू पाणी करार थांबवणे आणि पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा देणे थांबवणे आदींचा समावेश आहे.
On the recommendations of the Ministry of Home Affairs, Government of India has banned following Pakistani YouTube channels for disseminating provocative and communally sensitive content, false and misleading narratives and misinformation against
— Press Trust of India (@PTI_News) April 28, 2025
India, its Army and security… pic.twitter.com/2AjzeEuCsW
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सहा दिवसांनी, भारत सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. देश, सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक, सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री आणि खोट्या कथा पसरवल्याबद्दल भारतात 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेवर बंदी घातली आहे. भारत सरकारनं जाहीर केलेल्या 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलच्या यादीत उझैर क्रिकेट आणि समा स्पोर्ट्स सारख्या क्रीडा चॅनेलचाही समावेश आहे. तसंच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही बंदी घालण्यात आली आहे, मात्र त्याचं नाव मीडियामध्ये प्रसारित होणाऱ्या ब्लॉक केलेल्या चॅनेलच्या यादीत नव्हतं.
Multiple Pakistani YouTube channels have been banned in India.
— Ash (@Ashsay_) April 28, 2025
Well done, @GoI_MeitY
Check the following thread 🧵 @shoaib100mph youtube channel pic.twitter.com/Ry98hveB3w
क्रीडा चॅनल्सचा समावेश : भारतात बंदी घालण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेलमध्ये रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेलं शोएब अख्तरचं चॅनल 'शोएब अख्तर', माजी पाकिस्तानी कर्णधार बासित अलीचं यूट्यूब चॅनेल 'बसित अली', माजी पाकिस्तानी कर्णधार रशीद लतीफ आणि वरिष्ठ पत्रकार नौमन नियाज यांचं यूट्यूब चॅनेल 'कॉट बिहाइंड', माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज तनवीर अहमद यांचं यूट्यूब चॅनेल 'तनवीर सेज' यांचा समावेश आहे. याशिवाय, पाकिस्तानच्या पराभवानंतर त्याची खिल्ली उडवणारे दोन यूट्यूबर्स 'वासे हबीब' हे यूट्यूब चॅनेल देखील बंद करण्यात आलं आहे. जाहीर झालेल्या यादीत त्यांची नावं नसली तरी, सरकारच्या बंदीची अधिसूचना त्यांच्या चॅनलवर अजूनही दिसत आहे. त्यांच्या यूट्यूब प्रोफाइलवर असं लिहिलं आहे की 'राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारी आदेशांमुळं ही सामग्री सध्या या देशात उपलब्ध नाही.' परंतु लोक अजूनही त्यांचे जुने व्हिडिओ पाहू शकतात.

क्रीडा चॅनेल व्यतिरिक्त, प्रमुख पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवर देखील बंदी : क्रीडा चॅनेल व्यतिरिक्त, डॉन न्यूज, सामा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज सारख्या प्रमुख पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांचा समावेश आहे. इर्शाद भट्टी, अस्मा शिराजी, उमर चीमा, राजी नामा आणि मुनीब फारूख सारख्या पत्रकारांनी चालवलेले यूट्यूब चॅनेल देखील भारतीय वापरकर्त्यांसाठी ब्लॉक करण्यात आले आहेत.
🚨 SHOAIB AKHTAR'S YOUTUBE CHANNEL IS NOW BANNED IN INDIA. 🚨 pic.twitter.com/uVsM7fsgP4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 28, 2025
हेही वाचा :