वेलिंग्टन Most Duck by Opener : आणखी एक सामना, आणखी एक डाव आणि आणखी एक शून्यावर आउट. ही कहाणी आहे पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर हसन नवाजची. जो बाबर आझमच्या जागी टी-20 संघाचा भाग म्हणून न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता, जो कीवी संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. हसन नवाजनं या मालिकेतून त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. पण त्यानं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्या 5 डावात तीन वेळा शून्यावर बाद होऊन एक नवा पाकिस्तानी विक्रम रचला आहे.
Back-to-back home series wins 🏆 pic.twitter.com/3y2xOTPmiM
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 26, 2025
हसन नवाजनं रचला नवा विक्रम : हसन नवाज टी-20 मालिकेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा पाकिस्तानी सलामीवीर ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम शाहजैब हसन, मोहम्मद हाफीज आणि मोहम्मद रिझवान यांच्या नावावर होता, जे 2-2 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. मात्र त्या तिघांनी हसन नवाजप्रमाणे 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळलेली नाही. 2 सामन्यांच्या टी-20 मालिकेत शाहजैब हसन दोनदा शून्यावर बाद झाला आहे. तर मोहम्मद हाफीज 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत आणि मोहम्मद रिझवान 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेत शून्यावर बाद झाला आहे.
Time for the chase! A maiden T20I 5-wicket haul for Jimmy Neesham leads a strong performance with the ball. Follow LIVE and free in NZ on TVNZ 1, TVNZ+ 📺 Sport Nation NZ and The ACC 📻 LIVE scoring | https://t.co/TZTAt6S23R 📲#NZvPAK #cricketnation pic.twitter.com/rh7DRLxFcK
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 26, 2025
न्यूझीलंडविरुद्ध कधी झाला शून्यावर बाद : हसन नवाजनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात शून्यानं केली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये त्यानं 2 चेंडूंचा सामना केला आणि फक्त शून्य धावा काढल्या. ज्याप्रमाणे त्यानं मालिका सुरु केली होती, त्याचप्रमाणे त्याच्यासाठी मालिकाही त्याच प्रकारे संपली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात हसन नवाज 4 चेंडूंवर खातं न उघडता डगआउटमध्ये परतला. या दोन सामन्यांव्यतिरिक्त तो मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही शून्यावर बाद झाला. त्यात तो 3 चेंडू खेळल्यानंतर एकही धाव करु शकला नाही.
सर्वात जलद शतकही केलं : एकीकडे, हसन नवाजनं टी-20 मालिकेत तीन वेळा शून्यावर बाद होऊन पाकिस्तानचा नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यानंच पाकिस्तानसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही केला. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात हसन नवाजनं 44 चेंडूत शतक पूर्ण करुन ही कामगिरी केली. त्यानं बाबर आझमचा 49 चेंडूत शतक करण्याचा पाकिस्तानी विक्रम मोडला.
So far, Hasan Nawaz's international career:
— All Cricket Records (@Cric_records45) March 26, 2025
0 (2) vs 🇳🇿, Christchurch, 2025
0 (3) vs 🇳🇿, Dunedin, 2025
105* vs 🇳🇿, Auckland, 2025
1 (4) vs 🇳🇿, Mount Maunganui, 2025
0 (3) vs 🇳🇿, Wellington, 2025*
He has been dismissed four times, all by Jacob Duffy. pic.twitter.com/inNUtvytnm
न्यूझीलंडविरुद्ध हसन नवाजची कामगिरी : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील हसन नवाजच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 5 डावात 3 शून्य आणि 1 शतकासह 106 धावा केल्या आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तीन वेळा शून्यावर बाद होऊनही, हा फलंदाज मालिकेत पाकिस्तानसाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला.
हेही वाचा :