विशाखापट्टणम Nicholas Pooran : आयपीएल 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं शेवटच्या षटकात रोमांचक विजय नोंदवत लखनऊचा एका विकेटनं पराभव केला असला तरी, या सामन्यादरम्यान लखनऊचा खेळाडू निकोलस पूरननं जबरदस्त खेळी करत टी-20 क्रिकेटमध्ये 'गगनचुंबी' कामगिरी केली आहे. लखनऊच्या या स्फोटक फलंदाजानं असा एक विक्रम केला आहे, जो टी-20 क्रिकेटमधील दोन भारतीय स्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील करु शकले नाहीत. इतकंच नव्हे तर, एमएस धोनी देखील या यादीत नाही आणि महान सचिन तेंडुलकर देखील नाही.
Most T20 sixes in the Current decade
— All Cricket Records (@Cric_records45) March 24, 2025
443* : Nicholas Pooran (247 innings) 🌴
330 : Andre Russell (203 innings) 🌴
316 : Alex Hales (252 innings) 🏴
299 : Tim David (229 innings) 🇦🇺
295 : Liam Livingstone (192 innings) 🏴 pic.twitter.com/Kfo2FadGZY
पूरनचा विक्रम काय : खरंतर, निकोलस पूरननं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एक शानदार खेळी केली. त्यानं त्याच्या खेळीत सात षटकार मारले आणि यासह त्यानं पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमध्ये 600 षटकारांचा टप्पाही गाठला. निकोलसनं आतापर्यंत त्याच्या टी-20 कारकिर्दीत 606 षटकार मारले आहेत. याआधी, हा पराक्रम ख्रिस गेलनं केला आहे. ज्यानं त्याच्या टी-20 कारकिर्दीत 1056 षटकार मारले आहेत. यानंतर किरॉन पोलार्डचं नाव येतं, ज्याच्या नावावर 908 षटकार मारण्याचा विक्रम आहे. आंद्रे रसेल 733 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि निकोलस पूरन 606 षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे. टॉप ४ मधील सर्व फलंदाज वेस्ट इंडिजचे आहेत. रोहित शर्माबद्दल बोलायचं झालं तर, हिटमॅननं 449 सामन्यांमध्ये 525 षटकार मारले आहेत, तर विराट कोहलीनं 400 सामन्यांमध्ये फक्त 419 षटकार मारले आहेत.
Most 50+ scores at 250+ batting Strike Rate in IPL history
— All Cricket Records (@Cric_records45) March 24, 2025
4 : Kieron Pollard (171 innings) 🌴
3 : Jake Fraser McGurk (9 innings) 🇦🇺
3 : Travis Head (26 innings) 🇦🇺
3* : Nicholas Pooran (74 innings) 🌴 pic.twitter.com/hDKhc6j6Qc
निकोलस पूरनची वादळी खेळी : पूरन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि मैदानात येताच त्यानं शानदार फलंदाजी केली. या खेळाडूनं विप्रज निगमच्या षटकात 3 षटकार मारले आणि नंतर ट्रिस्टन स्टब्सच्या षटकात सलग 4 षटकार मारले. पूरननं त्याच्या डावात 7 षटकार आणि 6 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 250 होता. या सामन्यात पूरननं वेगवान गोलंदाजांविरुद्ध 12 चेंडूत 15 धावा केल्या. तर फिरकीपटूंविरुद्ध त्यानं 18 चेंडूत 60 धावा केल्या. पूरननं मार्शसोबत 42 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली. केवळ यामुळंच लखनऊ संघ चांगली धावसंख्या गाठू शकला.
🚨 600 T20 SIXES FOR POORAN! 🚨
— All Cricket Records (@Cric_records45) March 24, 2025
Nicholas Pooran becomes the 4th player to smash 600 T20 sixes—all four are from the West Indies.
1,056 – Chris Gayle (455 innings) 🌴
908 – Kieron Pollard (617 innings) 🌴
733 – Andre Russell (466 innings) 🌴
602* – Nicholas Pooran (359 innings)… pic.twitter.com/XMyb8GcBs9
सामन्याचा निकाल कसा : दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दिल्लीनं हा सामना 1 विकेटनं जिंकला. या सामन्याचा नायक आशुतोष शर्मा होता, ज्यानं 31 चेंडूत 66 धावांची तुफानी नाबाद खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएलमध्ये दोनदा 200 हून धावांचा टप्पा यशस्वीरित्या गाठला आहे.
हेही वाचा :