वेलिंग्टन NZ Beat PAK 8 Wickets : वेलिंग्टनमध्ये खेळलेला पाचवा टी-20 सामनाही न्यूझीलंडनं जिंकला आहे. यासह, त्यांनी पाकिस्तानविरुद्धची 5 टी-20 सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. पाचव्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. पाकिस्ताननं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 129 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, जे यजमान संघानं 10 षटकांत केवळ 2 गडी गमावून पूर्ण केलं.
Back-to-back home series wins 🏆 pic.twitter.com/3y2xOTPmiM
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 26, 2025
टिम सायफर्टची स्फोटक फलंदाजी : पाचव्या टी-20 सामन्यात पाकिस्ताननं दिलेल्या 129 धावांच्या लक्ष्याचं गाठताना न्यूझीलंडचा सलामीवीर टिम सायफर्टनं सर्वाधिक धावा केल्या. सायफर्टनं 255.26 च्या स्ट्राईक रेटनं 38 चेंडूत नाबाद 97 धावा केल्या. त्याच्या खेळीत 10 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. सायफर्ट आणि अॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी स्कोअरबोर्डवर 93 धावा जोडल्या. दोघांनी मिळून जलद सुरुवात केली, ज्यामुळं कीवी संघानं 30 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठलं.
Finishing the KFC T20I series with a bang! Tim Seifert (97*) finishes off a clinical all-round performance as the BLACKCAPS win the series 4-1. Catch up on the scores | https://t.co/TZTAt6S23R 📲 #NZvPAK #cricketnation pic.twitter.com/P96yGhh8oy
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 26, 2025
कर्णधार पाकिस्तानचे फलंदाज अपयशी : तत्पूर्वी, पाकिस्तान संघ 5 बदलांसह पाचवा टी-20 सामना खेळण्यासाठी आला आणि प्रथम फलंदाजी केली. पण 20 षटकांत 9 विकेट गमावल्यानंतर त्यांना फक्त 128 धावा करता आल्या. पाकिस्तानची सुरुवात खराब झाली आणि हसन नवाज पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला. त्यांच्या विकेट पडण्याचा क्रम सुरुच राहिला. पुन्हा एकदा कर्णधार सलमान आगानं पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. तो 39 चेंडूत 51 धावा करत नाबाद राहिला.
A spectacular all-round performance from New Zealand as they win the final T20I against Pakistan 💪#NZvPAK 📝: https://t.co/AZXACeRMsJ pic.twitter.com/fpbKhHHlcf
— ICC (@ICC) March 26, 2025
पाकिस्तानच्या आठ फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या गाठण्यात अपयश : पाचव्या टी-20 मध्ये पाकिस्तानकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज शादाब खान होता, ज्यानं 20 चेंडूत 28 धावा केल्या. पाकिस्तानची फलंदाजीची अवस्था इतकी वाईट होती की संघाचे 8 फलंदाज दुहेरी अंकही गाठू शकले नाहीत.
James Neesham's maiden T20I five-wicket haul keeps Pakistan in check 👊#NZvPAK 📝: https://t.co/AZXACeRMsJ pic.twitter.com/nvRwGbzuTx
— ICC (@ICC) March 26, 2025
हेही वाचा :