वेलिंग्टन NZ vs PAK 5th T20I Live Stream : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना 26 मार्च (बुधवार) रोजी वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत यजमान कीवी संघानं 3-1 नं अभेद्य आघाडी घेतली आहे.
The Backyard Social Club is back in Wellington tomorrow! Grab your tickets | https://t.co/65KztYWgMg #NZvAUS #NZvPAK #CricketNation pic.twitter.com/nwwzn8VIOf
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 24, 2025
चौथ्या सामन्यात कीवींचा विजय : तत्पुर्वी पाकिस्तानविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडनं शानदार कामगिरी करत 6 बाद 220 अशी मोठी धावसंख्या उभारली. टिम सेफर्ट (44) आणि फिन ऍलन (50) यांनी संघाला जलद सुरुवात दिली. मार्क चॅपमन (24) आणि डॅरिल मिशेल (29) यांनीही उपयुक्त खेळी केल्या. तसंच यानंतरक मायकेल ब्रेसवेलनं 26 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह ४६ धावा फटकावल्या. या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडनं पाकिस्तानसमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवलं.
पाकिस्तानचे फलंदाज अपयशी : लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या पाच षटकांतच अर्धा संघ बाद झाल्यानंतर संघ सावरु शकला नाही. जेकब डफी (4 विकेट) आणि झॅकेरी फॉल्क्स (3 बळी) यांच्या घातक गोलंदाजीनं पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. कोणताही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही आणि संपूर्ण संघ फक्त 105 धावांवर बाद झाला. या मोठ्या पराभवासह, पाकिस्ताननं मालिकाही गमावली कारण न्यूझीलंडनं हा सामना 115 धावांनी जिंकत मालिकेतही 3-1 अशी अजिंक्य आघाडी घेतली.
#StatChat | Going big! Last night’s 115-run victory over Pakistan was the team’s second-largest winning margin by runs in T20 internationals. The team’s largest run/margin was also at Bay Oval, by 119-runs against the West Indies in 2018. #NZvPAK #CricketNation 📷 = @photosportnz pic.twitter.com/5UHWuyQyzi
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 24, 2025
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 49 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात पाकिस्तान संघानं काहीशी वरचढ कामगिरी केली आहे. पाकिस्तान संघानं 24 सामने जिंकले आहेत. तर, न्यूझीलंड संघानंही 23 सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागलेला नाही. न्यूझीलंडच्या भूमीवर दोन्ही संघांमध्ये 25 टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात न्यूझीलंड संघानं 16 सामने जिंकले आहेत आणि 9 सामने गमावले आहेत.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला सामना : 16 मार्च, (न्यूझीलंड 9 विकेटनं विजयी)
- दुसरा सामना : 18 मार्च, (न्यूझीलंड 5 विकेटनं विजयी)
- तिसरा सामना : 21 मार्च, (पाकिस्तान 9 विकेटनं विजयी)
- चौथा सामना : 23 मार्च, (न्यूझीलंड 115 धावांनी विजयी)
- पाचवा सामना : 25 मार्च, स्काय स्टेडियम, वेलिंग्टन.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी-20 सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी-20 सामना शुक्रवारी म्हणजेच 26 मार्च रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11:45 वाजता वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर सुरु होईल. या सामन्याची नाणेफेक अर्धा तास आधी होईल.
Jacob Duffy led the charge with the ball as New Zealand wrapped up series win over Pakistan 🙌#NZvPAK pic.twitter.com/su0FSBbyyD
— ICC (@ICC) March 23, 2025
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी-20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी-20 सामना भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर बघता येईल. याशिवाय, तुम्ही फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
न्यूझीलंड संघ : टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), टिम रॉबिन्सन, फिन ऍलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ईश सोधी, जेकब डफी, बेन सीयर्स, काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क, मिशेल हे.
पाकिस्तान संघ : उस्मान खान (यष्टीरक्षक), सलमान आगा (कर्णधार), ओमैर युसूफ, अब्दुल समद, मोहम्मद हरिस, खुशदिल शाह, इरफान खान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी. अबरार अहमद, हरिस रौफ, सुफियान मुकीम, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, हसन नवाज, जहांदाद खान
हेही वाचा :