नेपियर New Zealand Squad : एकीकडे, भारतात IPL सुरु असताना, दुसरीकडे, न्यूझीलंडच्या भूमीवर कीवी संघ आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध मालिका खेळत आहेत. न्यूझीलंडनं पाकिस्तानविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 26 मार्च रोजी वेलिंग्टनमधील स्काय स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेनंतर, दोन्ही संघादरम्यान वनडे मालिका आयोजित केली जाईल, ज्यासाठी न्यूझीलंडनं आपला संघ जाहीर केला आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात न विकल्या गेलेल्या टॉम लॅथमला न्यूझीलंडनं वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिका 29 मार्चपासून नेपियरमध्ये सुरु होईल, ज्यात 3 सामने खेळवले जातील.
ICYMI | Our 13-strong squad for the upcoming Chemist Warehouse ODI series against Pakistan starting in Napier on Wednesday 🏏 #NZvPAK #CricketNation pic.twitter.com/KxLBFx1X0U
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 24, 2025
दोन नव्या खेळाडूंना संधी : या मालिकेसाठी न्यूझीलंडनं आपल्या संघात 2 नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघात पहिल्यांदाच मुहम्मद अब्बास आणि निक कॅली यांचा समावेश करण्यात आला आहे. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या अनुपस्थितीत केली विल यंगसोबत सलामीची संधी मिळवेल. रचिन आणि डेव्हॉन दोघंही आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा भाग आहेत. तसंच चौथ्या आणि निर्णयाक टी-20 सामन्यात अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावलेल्या फिन ऍलेनला देखील वनडे संघात स्थान मिळालेलं नाही.
Fast bowling club! Hear from young pace-bowler Zak Foulkes on the camaraderie among the quicks 🏏 The final T20I of the series is in Wellington on Wednesday. pic.twitter.com/xRsOxEKUBn
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 25, 2025
माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाच्या मुलाला संधी : अब्बासबद्दल बोलायचं झालं तर, 21 वर्षीय अब्बास हा न्यूझीलंडच्या स्थानिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिभावान ऑल-फॉर्मेट फलंदाजांपैकी एक आहे. अब्बास हा माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज अझहर अब्बास हराज यांचा मुलगा आहे, जे आपल्या कुटुंबासह न्यूझीलंडला गेल्यानंतर वेलिंग्टन आणि ऑकलंडसाठी देखील खेळले आहेत. अझहर अब्बास सध्या वेलिंग्टनचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत.
Fresh faces joining an experienced core 🤝
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 24, 2025
Hear from coach Gary Stead on the ODI squad named to face Pakistan in a 3-game series starting in Napier this Saturday. pic.twitter.com/o8V5iAMkL6
दिग्गज गोलंदाजाला दुखापत : या मालिकेसाठी केन विल्यमसननं स्वतःला अनुपलब्ध घोषित केलं, त्यानंतर त्याची संघात निवड झाली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत वेगवान गोलंदाज काइल जेमीसन कीवी संघाचा भाग असणार नाही. काइल जेमीसनच्या कामाचा ताण लक्षात घेऊन निवडकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, वेगवान गोलंदाज मॅट हेन्री खांद्याच्या आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळं संघाबाहेर असेल.
आदित्य अशोकचं संघात पुनरागमन : शेवटच्या दोन सामन्यांसाठी टी-20 संघात परतलेला विल ओ'रोर्क वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत वनडे सामन्यांमध्ये वेगवान आक्रमणाचं नेतृत्व करत राहील. बेन सियर्स, जेकब डफी आणि नॅथन स्मिथ हे देखील वेगवान आक्रमणाचा भाग असतील तर ऑकलंडचा लेग-स्पिनर आदित्य अशोक, ज्यानं शेवटचा वनडे सामना डिसेंबर 2023 मध्ये खेळला होता, त्याला संघात परत बोलावण्यात आलं आहे.
Was it all a dream!? Hear from Nick Kelly fresh from his BLACKCAPS call-up for the upcoming series v Pakistan. pic.twitter.com/TlY2P3FBXE
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 25, 2025
न्यूझीलंडचा वनडे संघ : टॉम लॅथम (कर्णधार, यष्टिरक्षक), मुहम्मद अब्बास, आदित्य अशोक, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, जेकब डफी, मिच हे (यष्टिरक्षक), निक केली, डॅरिल मिशेल, विल ओ'रोर्क, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ, विल यंग.
हेही वाचा :