बंगळुरु Victory Parade Bengaluru : 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. आरसीबीच्या विजयानंतर संघ बंगळुरुमध्ये विजय परेडद्वारे हा विजय साजरा करेल असं वृत्त आधी आलं होतं. परंतु शहराच्या वाहतूक कोंडीचा हवाला देत पोलिसांनी विजयी परेडला परवानगी दिली नव्हती. त्यातच यानंतर संघाच्या विजयी जल्लोषात झालेल्या दुर्घटनेत 11 लोकांना आपला जीव गमवावा लागला.
आज बंगलोर मध्ये झालेला प्रकार पाहता,
— R.R.Mhatre (@MhatreFrmAlibag) June 4, 2025
मुंबई ही मुंबई आहे,
इतर कोणत्या म्हणजे कोणत्याच शहराला त्याची सर येणार नाही.
अगदी वर्षभरापूर्वी झालेल्या या रॅलीला कोणताही गालबोट लागला नाही
याआधीही मोठ मोठ्या गोष्टी मुंबई पोलिसांनी अगदी सुरळीत पणे सांभाळल्यात
त्यामुळे मुंबईला याची सवय आहे❤️ pic.twitter.com/tcUbrWQJjh
पोलिसांनी नाकारली परवानगी : प्रत्यक्षात, बेंगळुरु पोलिसांनी आरसीबी संघाला विजयी परेडसाठी परवानगी दिलेली नव्हती. शहरातील वाहतूक व्यवस्थेला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, बेंगळुरु पोलिसांनी आरसीबी संघाला विजयी परेडसाठी परवानगी दिलेली नाही. आरसीबी संघ दुपारी 1 वाजता बंगळुरुला पोहोचला. यानंतर, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सायंकाळी 5 च्या सुमारास सत्कार समारंभ झाला. समारंभासाठी ज्यांच्याकडे पास किंवा तिकीट आहे त्यांनाच स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल, असं सांगण्यात आलं. चिन्नास्वामी स्टेडियमभोवती मर्यादित पार्किंग सुविधा आहे, त्यामुळं प्रशासनानं लोकांना मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचाही सल्ला दिला होता.

मुंबईसारखं जमणं नाही : वास्तविक देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या मुंबईसारख्या शहरात याआधी अनेक विजयी परेड झालेल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघानं 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर संघाची विजयी परेड मुंबईत काढण्यात आली होती. तसंच 2019 च्या आयपीएल नंतर मुंबई इंडियन्स संघानं जेतेपद पटकावल्यावर भव्य परेड निघाली आहे. इतकंच नव्हे तर 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं पुन्हा टी-20 विश्वचषकावर कोरलं तेव्हा देखील संघाची विजयी परेड शहरात निघाली होती. मात्र बेंगळुरुत झालेल्या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर मुंबई सारखं जमणं नाही, मुंबईची बरोबरी होणे नाही, या आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.
Big Salute to @MumbaiPolice 🫡💙 pic.twitter.com/DrClHRyJj9
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) June 4, 2025
चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यासारख्या संघांनी आपल्या विजयांनंतर भव्य सेलिब्रेशन केलं होतं. मात्र मुंबईसारखं आरसीबीला करता आली नाही, हे समजल्यावर अनेक चाहते निराश झाले. परिणामी आरसीबीच्या ऐतिहासिक विजयावर असं विरजण पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक चाहत्यांनी या घटनेनंतर सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला आहे.
0 deaths here
— 🅷🅸🆃🅼🅰🅽 (@ImkS45) June 4, 2025
How does Mumbai pull this off#chinnaswamystadium #stampede pic.twitter.com/fGM73PSmMZ
हेही वाचा :