चेन्नई Ball Tampering : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा तिसरा सामना पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्याला स्पर्धेतील 'एल क्लासिको' असंही म्हटलं जातं. रविवारी संध्याकाळी, चेपॉक स्टेडियमवर, यजमान संघ चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सचा 4 गडी राखून पराभव केला. मुंबईनं सलग 13व्या वर्षी हंगामातील पहिला सामना गमावला. या सामन्यात, माजी सीएसके कर्णधार एमएस धोनी आणि रचिन रवींद्र यांची बरीच चर्चा झाली. पण आता सामन्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमुळं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
Khaleel Ahmed Gives something to Ruturaj Gaikwad secretly after doing ball tempering and ruturaj put it in his pocket.
— Kevin (@imkevin149) March 24, 2025
These fixers should be banned again for forever. pic.twitter.com/EY0mHHNeRf
गायकवाड आणि खलीलचा व्हिडिओ वेगानं व्हायरल : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि वेगवान गोलंदाज खलील अहमद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये, खलील अहमद त्याच्या खिशातून काहीतरी काढतो आणि गायकवाडला देतो. गायकवाड ते खिशात ठेवतो. मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये काय देवाणघेवाण झाली. याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण सोशल मीडियावरील काही वापरकर्त्यांनी खेळाडूंवर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला आहे. काहींनी या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित केले आहेत की हा बॉल टॅम्परिंग आहे का तर एका वापरकर्त्याचा असा विश्वास आहे की हा बॉल टॅम्परिंग नाही. खलीलनं त्याची अंगठी गायकवाडला दिली होती. त्याच वेळी, एका चाहत्यानं असंही लिहिलं आणि शेअर केले की सीएसकेवर 2 वर्षांची बंदी घातली जाईल.
Khaleel Ahmed was doing something to ball with an unknown object then he gave that object to Ruturaj Gaikwad....
— Jonas Kahnwald (@JonasKahnwaldOG) March 24, 2025
Is it BALL TEMPERING👀👀
BCCI must investigate it.....#CSKvsMI
Video Credit:- @JioHotstar, @StarSportsIndia & @IPL pic.twitter.com/HlEMYExO1c
बॉल टॅम्परिंगचा नियम काय : बॉल टॅम्परिंग हा एक नियम आहे ज्यात जर कोणी बॉलशी छेडछाड करताना पकडलं गेलं तर त्याला शिक्षा होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हा नियम अनेकदा दिसून आला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश असलेला सॅंडपेपर गेट घोटाळा सर्वात लोकप्रिय होता. यामध्ये स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांना कठोर शिक्षा देण्यात आली. आयपीएलमध्ये आतापर्यंत असं कोणतंही प्रकरण समोर आलेलं नाही पण यावेळी हा मुद्दा किती तापतो हे काही तासांत किंवा दिवसांत कळेल. साधारणपणे, क्रिकेटच्या नियमांनुसार, एमसीसी कायदा 42.3 अंतर्गत बॉल टॅम्परिंग हा गुन्हा मानला जातो. याअंतर्गत, असं करणाऱ्या खेळाडू किंवा संघावर एक ते दोन वर्षांची बंदी घातली जाऊ शकते.
चेन्नईवर लागली होती दोन वर्षांची बंदी : चेन्नई सुपर किंग्जवर आधीच दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 2013 मध्ये उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जवर गंभीर आरोप करण्यात आले होते. यामुळं दोन्ही संघांवर 2016 आणि 2017 मध्ये दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यानंतर 2018 मध्ये फ्रँचायझी लीगमध्ये परतली. जर ही बाब खरी ठरली तर फ्रँचायझीच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. मात्र चाहत्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये किती तथ्य आहे हे तपासानंतरच कळेल. पण सोशल मीडियावरील चाहत्यांचा राग पाहण्यासारखा आहे.
Khaleel Ahmed Gives something to Ruturaj Gaikwad secretly after doing ball tempering and Ruturaj puts it in his pocket.
— Crush Donor 🧬 (@crush_donor) March 24, 2025
Is it true @Lohith_Reddy_07
🤔 #justasking pic.twitter.com/x0M6jZ8WGA
कसा राहिला सामना : सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबईनं प्रथम फलंदाजी केली आणि संघ 20 षटकांत फक्त 155 धावा करु शकला. या सामन्यात रोहित शर्माला आपलं खातंही उघडता आलं नाही. मुंबईकडून तिलक वर्मानं सर्वाधिक 31 धावा केल्या तर चहरनंही 28 धावा केल्या. चेन्नईकडून नूर अहमदनं 4 आणि खलील अहमदनं 3 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईनं 19.1 षटकांत 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. त्यांच्याकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडनं फक्त 26 चेंडूत 53 धावा केल्या, तर रचिन रवींद्र 65 धावा करुन नाबाद परतला.
हेही वाचा :