मुंबई MI Beat SRH : येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या 33व्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 4 विकेट्सनं दारुण पराभव केला आहे. सनरायझर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 162 धावांचं लक्ष्य मुंबईसमोर ठेवलं होतं. मुंबईनं हे लक्ष्य सहा फलंदाजांच्या मोबदल्यात आरामशीर पार केलं. यासह मुंबईनं या स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला असून त्यांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अद्याप जिवंत आहेत, तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादसाठी मात्र आता प्ले ऑफ फेरी गाठणं जवळजवळ अशक्य झाल्यासारखं आहे.
𝐖𝐢𝐥𝐥 for the 𝐖𝐢𝐧 💪
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2025
A complete all-round performance from Will Jacks earns him a well deserved Player of the Match award 🫡
Scorecard ▶ https://t.co/8baZ67Y5A2#TATAIPL | #MIvSRH | @mipaltan pic.twitter.com/s10ej494Rv
हैदराबादची मर्यादित धावसंख्या : या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकत सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. यानंतर मिळालेल्या संधीचा फायदा घेत हैदराबादच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅवीस हेड यांनी 7.3 षटकात 59 धावांची भागीदारी केली. यात अभिषेक शर्मानं आक्रमक पवित्रा घेत अनेक फटके मारले. मात्र आठव्या षटकात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यानं अभिषेक शर्मा (40) ला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर ट्रॅवीस हेड देखील बाद झाला. तसंच मुंबईचा माजी खेळाडू ईशान किशन सुद्धा अवघ्या दोन धावांवर पॅवेलियनमध्ये परतला. मात्र शेवटच्या षटकांमध्ये हेनरिक क्लासेसनन केलेल्या छोटेखानी आक्रमक खेळीमुळं हैदराबादला निर्धारित 20 षटकांत पाच बाद 162 धावा करता आल्या. मुंबईकडून वील जॅकनं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या तर हार्दिक पांड्या, ट्रेंट बोल्ड आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
महासंग्राम का पहला अध्याय हमारे नाम! 🔥#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvSRH pic.twitter.com/TrqDjw33YI
— Mumbai Indians (@mipaltan) April 17, 2025
मुंबईची उपयुक्त फलंदाजी : हैदराबादनं दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबईनं आक्रमक सुरुवात केली. 'लोकल बॉय' रोहित शर्मानं 16 चेंडूत तीन षटकारांसह 26 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर रियान रिकल्टन (31), विल जॅक (36), सूर्यकुमार यादव (26) आणि हार्दिक पांड्या (21) यांनी उपयुक्त खेळी करून मुंबईला विजय मिळवून दिला. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सनं सर्वाधिक तिन, ईशान मलिंगानं 2 तर हर्षल पटेलनं 1 विकेट घेतली.
𝐓𝐇𝐑𝐄𝐄 𝐖𝐈𝐍𝐒 𝐈𝐍 𝐀 𝐑𝐎𝐖 𝐀𝐆𝐀𝐈𝐍𝐒𝐓 𝐒𝐑𝐇 𝐀𝐓 𝐖𝐀𝐍𝐊𝐇𝐄𝐃𝐄 ✅
— Mumbai Indians (@mipaltan) April 17, 2025
Kay mag, maja aali na? 😉#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvSRH
रोहित शर्माचा सामन्यापूर्वी खास सन्मान : दरम्यान या सामन्याच्या अगदी आधी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला विशेष शिल्ड देऊन सन्मानित केले. रोहितला आयपीएलमध्ये 18 वर्षे पूर्ण केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला. रोहित शर्मा आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या लीगचा भाग आहे आणि म्हणूनच लीगची 18 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याला सन्मानित करण्यात आलं. यावर्षी, बीसीसीआय आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून सतत खेळणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करत आहे. त्याच्या आधी विराट कोहली आणि एमएस धोनी यांनाही सन्मानित करण्यात आले होते.
1️⃣8️⃣ seasons 🤝 1️⃣ Legacy
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2025
Rohit Sharma of the Mumbai Indians receives a special memento from BCCI President, Mr. Roger Binny 💙#TATAIPL | #MIvSRH | @mipaltan | @ImRo45 pic.twitter.com/dXANupM8Sb
हेही वाचा :