ETV Bharat / sports

"रोहित शर्मा असा खेळाडू..." CSK ला पराभूत केल्यानंतर हार्दिक पांड्याचं रोहितबाबत मोठं वक्तव्य - HARDIK PANDYA

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मानं शानदार फलंदाजी केली. त्यानं 45 चेंडूत 76 धावा केल्या.

Hardik Pandya in Post Match Presentation
हार्दिक पांड्या (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 21, 2025 at 1:28 PM IST

Updated : April 21, 2025 at 1:35 PM IST

1 Min Read

मुंबई Hardik Pandya in Post Match Presentation : आयपीएल 2025 मध्ये, मुंबई इंडियन्सच्या संघानं चेन्नई सुपर किंग्जचा 7 गडी राखून पराभव केला. संघासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. मुंबईकडून रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. तर जसप्रीत बुमराहनं चांगली गोलंदाजी केली. या खेळाडूंमुळंच मुंबई संघ विजय नोंदवण्यात यशस्वी झाला.

हार्दिकनं केलं सूर्या आणि रोहितचं कौतुक : सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, आम्ही ज्या प्रकारचं क्रिकेट खेळत आहोत, मोठ्या धावसंख्येच्या खेळपट्टीवर आम्ही ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आणि नंतर लक्ष्य गाठलं ते खूप चांगलं आहे. रोहित शर्मा असा खेळाडू आहे की जेव्हा तो फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो स्वतःच्या बळावर विरोधी संघाच्या हातातून विजय हिसकावून घेतो. रोहित आणि सूर्यकुमार ज्या पद्धतीनं फलंदाजी करत आहेत. ते सुखदायी आहे.

संघातील प्रत्येक खेळाडूचं योगदान : हार्दिक पांड्या म्हणाला की, प्रत्येक खेळाडू योगदान देत आहे. आम्ही फक्त साध्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि आमच्या योजना राबवत आहोत. वेगवान गोलंदाजांनी नक्कीच धावा दिल्या, पण 175-180 चा स्कोअर सरासरीपेक्षा कमी होता. मला वाटतं आपण विजयापासून फार दूर नव्हतो. आम्हाला फक्त गोष्टी एकत्र करायच्या होत्या.

सूर्या आणि रोहितच्या स्फोटक फलंदाजीनं जिंकला सामना : मुंबईच्या वानखेडेवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं प्रथम फलंदाजी करत 176 धावा केल्या. सीएसकेकडून रवींद्र जडेजा (53 धावा) आणि शिवम दुबे (50 धावा) यांनी उत्तम अर्धशतकं झळकावली. नंतर, रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी मुंबई इंडियन्ससाठी पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली आणि विजयाचा पाया रचला. संघाकडून रोहितनं 45 चेंडूत 76 धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवनं 68 धावा केल्या. रोहितला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा :

  1. 'मुंबईचा राजा रोहित शर्मा'च्या नावावर IPL मध्ये अनोखा विक्रम; 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
  2. BCCI कडून केंद्रीय कराराची घोषणा; IPL दरम्यान 34 खेळाडूंना लॉटरी, वाचा यादी

Last Updated : April 21, 2025 at 1:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.