लाहोर Corbin Bosch Banned : भारतात आयपीएल 2025चं आयोजन उत्तम पद्धतीनं केलं जात आहे आणि चाहत्यांना रोमांचक सामने देखील पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान सुपर लीगही आज म्हणजेच 11 एप्रिलपासून सुरु होईल. याचा अर्थ असा की दोन्ही लीगमधील संघर्ष अपरिहार्य आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू कॉर्बिन बॉशनं पाकिस्तान सुपर लीगच्या ड्राफ्टमध्ये आपलं नाव नोंदवलं होतं. यानंतर, पीएसएल फ्रँचायझी पेशावर झल्मीनं त्याला ड्राफ्टद्वारे निवडलं. पण नंतर त्याला आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने लिझार्ड विल्यम्सच्या जागी 75 लाख रुपयांना संघात समाविष्ट केलं. यानंतर त्यानं पीएसएलऐवजी आयपीएल लीग खेळण्याची निवड केली. आता यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्याला पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये खेळण्यास एका वर्षाची बंदी घातली आहे.
Joint Statement by the PCB and Corbin Bosch
— PCB Media (@TheRealPCBMedia) April 10, 2025
Details here ⤵ https://t.co/x70N180a5F
कॉर्बिन बॉशनं मागितली माफी : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये कॉर्बिन बॉश म्हणाला की, पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल मला खूप वाईट वाटते आणि मी पाकिस्तानच्या जनतेची, पेशावर झल्मीच्या चाहत्यांची आणि व्यापक क्रिकेट समुदायाची मनापासून माफी मागतो. मी माझ्या कृतीची पूर्ण जबाबदारी घेतो आणि पीएसएलमधून एका वर्षाची बंदी स्वीकारतो. हा एक कठीण धडा होता, परंतु मी या अनुभवातून शिकण्यासाठी वचनबद्ध आहे आणि चाहत्यांच्या विश्वासानं भविष्यात पाकिस्तान सुपर लीगमध्ये परतण्याची आशा करतो. निराश केल्याबद्दल मला खरोखर वाईट वाटते. दुसरीकडे, कॉर्बिन बॉशला आयपीएल 2025 मध्ये अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
🚨 PCB BANS CORBIN BOSCH FROM PSL FOR 1 YEAR 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) April 10, 2025
Corbin Bosch said " i deeply regret my decision to withdraw from the pakistan super league and offer my sincere apologies to the people of pakistan, the fans of peshawar zalmi and the wider cricket community". pic.twitter.com/gMTAB9Mj5W
आयपीएल लिलावात न विकलेले खेळाडू पीएसएलमध्ये : पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झाल्यानंतर भविष्यात खेळाडूंना आयपीएलमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी पीसीबीनं हा मोठा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन ते इतरांसाठी एक उदाहरण बनू शकेल. यावेळी पीसीबीनं आयपीएलसोबत पीएसएलचं आयोजन केलं आहे. त्यामुळं आयपीएलच्या मेगा लिलावात न घेतलेल्या खेळाडूंना खरेदी करता येईल. ते त्यांना पीएसएलमध्ये खेळवू शकतात. यावेळी डेव्हिड वॉर्नर, डॅरिल मिशेल, जेसन होल्डर, रॅसी बेन दुसान आणि केन विल्यमसन सारखे स्टार खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसतील, कारण आयपीएलच्या लिलावात या खेळाडूंना कोणतीही बोली लागली नव्हती आणि हे खेळाडू विकले गेले नव्हते.
Corbin Bosch has been handed a one-year ban from participating in the Pakistan Super League. pic.twitter.com/ELndx7Q5Cj
— Cricbuzz (@cricbuzz) April 11, 2025
दोन्ही स्पर्धा एकाच वेळी : या वर्षी आयपीएल आणि पीएसएल दोन्ही स्पर्धा जवळजवळ एकाच वेळी होत आहेत. आयपीएल 22 मार्च ते 25 मे पर्यंत चालेल आणि पीएसएल 11 एप्रिल ते 18 मे पर्यंत खेळवली जाईल. 2016 मध्ये पीएसएल लाँच झाल्यानंतर पहिल्यांदाच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या अनेक सामन्यांसह त्यांची विंडो टक्कर देत आहे. कॉर्बिन बॉशनं आतापर्यंत तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध वनडे सामन्यात पदार्पण केलं आणि त्याच महिन्यात कसोटी सामन्यातही पदार्पण केलं.
हेही वाचा :