मुंबई Shivneri Bus : सध्या आयपीएलचा 18वा हंगाम सुरु झाला आहे. अशातच सध्या गल्लोगल्ली चेन्नई सुपर किंग्स की मुंबई इंडियन्स यावर्षीची ट्रॉफी कोण जिंकणार? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये जशी भारत पाकिस्तान मॅच लोकं सर्व कामं बाजूला ठेवून पाहतात तसंच, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांची मॅच लोकं सर्व कामं बाजूला ठेवून पाहतात. असाच एक प्रसंग एका बस चालकासोबत घडला असून, बस चालवत असताना या बस चालकानं मोबाईलवर मॅच पाहिल्यानं त्याला थेट कामावरुन बडतर्फ करण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय : प्राप्त माहितीनुसार, सदर घटना शनिवारी संध्याकाळची असून, राज्य परिवहन महामंडळाची दादर पूर्वेहून सायंकाळी सात वाजून 30 मिनिटांनी स्वारगेटला जाणाऱ्या ई–शिवनेरी बसच्या चालकानं हा प्रकार केला आहे. नियोजित वेळेनुसार गाडी दादर पूर्व स्थानकातून निघाली. मात्र, संध्याकाळी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना पाहण्याचा मोह सदर बस चालकाला आवरता आला नाही. त्यानं गाडी चालवता चालवता आपल्या मोबाईलवर हा सामना पाहण्यास सुरुवात केली. आपण ज्या गाडीतून प्रवास करत आहोत त्या गाडीचा चालक गाडी चालवताना मोबाईलवर मॅच पाहत असल्याचं बसमधील काही प्रवाशांनी पाहिले. त्यांनी त्याचा फोटो आणि व्हिडिओ काढला आणि सदर बस चालकाची तक्रार थेट परिवहन मंत्र्यांकडे केली.
The men in 💛 take home the honours! 💪
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
A classic clash in Chennai ends in the favour of #CSK ✨
Scorecard ▶ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL pic.twitter.com/ZGPkkmsRHe
चालकाला कामावरुन सुट्टी : बसमधील प्रवाशांना चालकाच्या केबिन मधून क्रिकेट कॉमेंट्रीचा आवाज येत होता. सदर बस चालक गाडीच्या स्पीडोमीटरवर मोबाईल ठेवून सामना पाहत होता. गंभीर बाब म्हणजे गाडी तेव्हा लोणावळा भागात होती आणि गाडीचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटर होता. अशी तक्रार या बसमधील काही प्रवाशांनी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली. प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सदर चालकावर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. परिणामी सदर बस चालकाला राज्य परिवहन महामंडळानं थेट सेवेतून बडतर्फ केलं असून, बस चालवताना कोणत्याही चालकानं असा प्रकार केल्यास त्यावर कारवाई करण्याचा इशारा महामंडळानं दिला आहे.
Spin to Win 🕸👌
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
Noor Ahmad is the Player of the Match for his excellent spell of 4/18 on his #CSK debut 🔝
Scorecard ▶ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL pic.twitter.com/gA4fQ6arVT
सामन्यात चेन्नईचा विजय : सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबईनं प्रथम फलंदाजी केली आणि संघ 20 षटकांत फक्त 155 धावा करु शकला. या सामन्यात रोहित शर्माला आपलं खातंही उघडता आलं नाही. मुंबईकडून तिलक वर्मानं सर्वाधिक 31 धावा केल्या तर चहरनंही 28 धावा केल्या. चेन्नईकडून नूर अहमदनं 4 आणि खलील अहमदनं 3 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईनं 19.1 षटकांत 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. त्यांच्याकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडनं फक्त 26 चेंडूत 53 धावा केल्या, तर रचिन रवींद्र 65 धावा करुन नाबाद परतला.
हेही वाचा :