चेन्नई MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी आयपीएल 2025 ची सुरुवात यापेक्षा चांगली होऊ शकली नसती. कारण नवीन हंगामातील पहिलाच सामना घरच्या मैदानावर चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला आणि चेन्नईनं तो जिंकला. हा सामना चेन्नईच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध होता आणि संघानं हा सामना अगदी सहज जिंकला. संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीनं आपली जादू दाखवल्यानं हा विजय आणखी खास झाला.
Swashbuckled left and right! 💥💥💪🏻#CSKvMI #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/xba6HLsOuM
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 23, 2025
धोनीची चपळाई : चेपॉक इथं खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात धोनीनं आपल्या उत्कृष्ट विकेटकीपिंगनं मुंबईला सर्वात मोठी विकेट घेतलीली. क्षणार्धात त्यानं मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवला यष्टीचीत करुन आपली चुणुक दाखवली. यादरम्यान स्टेडियममधील गोंगाट शिगेला पोहोचला होता. यानंतर, चेन्नई फलंदाजी करताना 19व्या षटकात धोनी फलंदाजीसाठी आला तेव्हा स्टेडियम अशा आवाजानं गूंजलं होतं. धोनीच्या बॅटमधून एकही धाव आली नाही, तरी चाहत्यांना तो फलंदाजीसाठी येत असल्याचं पाहणं पुरेसं होतं.
Fitting end to the blockbuster Sunday! ✋🏻🦁🤚🏻#CSKvsMI #WhistlePodu
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 23, 2025
pic.twitter.com/mWQDC3E2iB
धोनीनं दीपक चहरला मारली बॅट : सामन्याच्या 20व्या षटकात, रचिन रवींद्रनं सामना जिंकणारा शॉट आला. चेन्नईच्या विजयानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी धोनी मुंबईच्या खेळाडूंशी बोलत होता आणि हस्तांदोलन करत होता, पण नंतर मुंबई इंडियन्सचा गोलंदाज दीपक चहर त्याच्यासमोर आला. चहरनं धोनीला काहीतरी सांगितलं आणि धोनीनं लगेच त्याची बॅट उचलली आणि त्याच्या पाठीमागे मारली. पण धोनीनं हे रागाच्या भरात केलं नाही, तर त्यानं ते विनोदी पद्धतीनं केलं.
मजेशीर पद्धतीनं मारली बॅट : खरंतर, दीपक चहर सलग 7 हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू होता. यादरम्यान त्यानं धोनीच्या नेतृत्वाखाली त्या संघासाठी अनेक उत्कृष्ट कामगिरी केली. धोनीसोबतची त्याची मैत्री खूप खास आहे, जी मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक वेळा दिसून आली आहे. तो अनेकदा धोनीसोबत विनोद करताना दिसला आहे. यावेळीही असंच काहीसं घडलं, जेव्हा धोनीनं मुंबई संघात आलेल्या चहरला मजेदार पद्धतीनं बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला आणि चहरनंही स्वतःला वाचवण्यासाठी उडी मारली. दोघांचा हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे.
Deepak Chahar MS Dhoni ke saath masti karta rehta hai, aur isiliye Dhoni bhi apne bat se isko ‘treatment’ dete hue—ekdum funny andaaz mein! Yeh scene toh blockbuster hai.😂#deepakchahar #msdhoni #dhoni #CSKvsMI pic.twitter.com/dMLgfSXqML
— I Love my India 🇮🇳❤️ (@teenagers50) March 23, 2025
कसा राहिला सामना : सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबईनं प्रथम फलंदाजी केली आणि संघ 20 षटकांत फक्त 155 धावा करु शकला. या सामन्यात रोहित शर्माला आपलं खातंही उघडता आलं नाही. मुंबईकडून तिलक वर्मानं सर्वाधिक 31 धावा केल्या तर चहरनंही 28 धावा केल्या. चेन्नईकडून नूर अहमदनं 4 आणि खलील अहमदनं 3 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईनं 19.1 षटकांत 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. त्यांच्याकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडनं फक्त 26 चेंडूत 53 धावा केल्या, तर रचिन रवींद्र 65 धावा करुन नाबाद परतला.
हेही वाचा :