ETV Bharat / sports

0,0,0,0,0,...शुन्यावर आउट झाले सहा फलंदाज; वनडे क्रिकेटच्या इतिहासात 'असं' सहाव्यादांच घडलं - MOST BATTERS OUT ON DUCK

ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 मध्ये संयुक्त अरब अमिराती आणि ओमान यांच्यात खेळला गेलेला सामना एतिहासिक ठरला. या सामन्यात UAE च्या संघानं लाजिरवाणा विक्रम केला.

6 Batters out on Zero
शुन्यावर आउट झाले सहा फलंदाज (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 8, 2024, 9:38 AM IST

अल अमेरत (ओमान) 6 Batters out on Zero : ICC क्रिकेट विश्वचषक लीग-2 मध्ये ओमानच्या संघानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. गुरुवारी झालेल्या संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या सामन्यातही ओमान संघानं एकतर्फी विजय मिळवला. पण युएईचा संघ या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. संघाचा एकही फलंदाज जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही, त्यामुळं UAE संघाचं नाव लाजिरवाण्या यादीत समाविष्ट झालं. या लाजिरवाण्या यादीत यापूर्वी केवळ पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघांचं नाव होतं.

UAE संघाची अवस्था वाईट : ओमानमधील अल अमेरत क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात ओमाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य ठरला. या डावात UAE चे एक दोन नव्हे तर तब्बल 6 फलंदाज आपलं खातंही उघडू शकले नाहीत म्हणजे ते शुन्यावर बाद झाले. वनडे क्रिकेटच्या इतिहासात ही सहावी वेळ होती, जेव्हा एका संघाचे 6 फलंदाज वनडे सामन्यात खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. याआधी पाकिस्तान संघानं हा लाजिरवाणा विक्रम तीनदा केला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेच्या संघांनाही एकदा अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे.

ओमानची घातक गोलंदाजी : UAE च्या या डावात आर्यांश शर्मा, विष्णू सुकुमारानी, ​​कर्णधार राहुल चोप्रा, अयान खान, ध्रुव पराशर आणि राहुल भाटिया आपलं खातं न उघडताच बाद झाले. त्यामुळं UAE नं प्रथम फलंदाजी करताना 25.3 षटकांत 10 गडी गमावून केवळ 78 धावा केल्या. त्याचबरोबर या सामन्यात शकील अहमद ओमानकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शकील अहमदनं 10 षटकांत केवळ 23 धावा दिल्या आणि 5 फलंदाजांना आपला बळी बनवलं. याशिवाय जय ओडेद्रालाही 2 बळी घेण्यात यश आलं. मुजाहिर रझा आणि समय श्रीवास्तव यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.

ओमान संघानं जिंकला सामना : प्रत्युत्तरात 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमान संघानं 24.1 षटकांत 6 गडी गमावून 79 धावा केल्या आणि सामना जिंकला. ओमानसाठी आमिर कलीमनं सर्वाधिक 32 धावांची खेळी खेळली, ज्यात 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी हम्माद मिर्झानं 20 धावांचं योगदान दिलं. दुसरीकडे, यूएईसाठी बासिल हमीदनं सर्वाधिक 3 आणि अयान खाननं 2 विकेट घेतल्या, परंतु ते संघाच्या विजयासाठी पुरेसं नव्हतं.

हेही वाचा :

  1. 7 वर्षांनंतर पाकिस्तान ऑस्ट्रेलियात वनडे सामना जिंकणार? निर्णायक 'करो किंवा मरो' मॅच 'इथं' पाहा लाईव्ह
  2. स्टेडियममध्ये बसून आंतरराष्ट्रीय T20 सामना बघायचा? ट्रेनच्या तिकिटांपेक्षा स्वस्तात मिळतंय मॅचचं तिकिट, 'असं' करा खरेदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.