मुंबई MCA Umpire Dies : क्रिकेटच्या मैदानावर एक अतिशय दुःखद घटना घडली. ज्यामुळं स्थानिक क्रिकेट हादरलं आहे. कारण मैदानावर सामन्यातील अंपायरचा मैदानावरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळं क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय झालं नेमकं : वास्तविक मंगळवारी क्रॉस मैदानातील सुंदर क्रिकेट क्लबच्या मैदानावर केआरपी इलेव्हन सीसी आणि क्रेसेंट सीसी यांच्यातील भामा कप अंडर-19 सामन्याचा 11वा षटक सुरु होता तेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) चे अंपायर प्रसाद माळगावकर (60) स्क्वेअर लेगवर उभे होते. यांचे सहकारी पंच पार्थमेश आंगणे आणि सामन्यात सहभागी असलेल्या खेळाडूंना वाटलं नव्हतं की माळगावकर षटकाच्या दोन चेंडूंनंतर या जगाचा निरोप घेतील. या सामन्यादरम्यान अंपायर प्रसाद माळगावकर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचं बोललं जातंय.
डॉक्टरांनी केलं मृत घोषित : 11व्या षटकासाठी माळगावकर स्क्वेअर लेगवर आपली जागा घेत होता. सहकारी पंच पार्थमेश अंगणे यांनी सांगितलं की, त्यांना बरं वाटत नव्हतं आणि टॉसपूर्वी त्यांनी अॅसिडिटीची तक्रार केली होती. मी त्यांना गरज पडल्यास आराम करायला सांगितलं, पण ते म्हणाले की ठीक आहे. त्यांना यानंतर तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तसंच कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले एमसीए समन्वयक दत्ता मिठबावकर म्हणाले, "आम्ही त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. खेळाडूंच्या मदतीनं आम्ही त्यांना सुंदर सीसीच्या खेळपट्टीवरुन जवळच्या नॅशनल सीसीमध्ये आणि तेथून टॅक्सीनं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
क्रिकेट विश्वात हळहळ : या घटनेनंतर एमसीए अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य आणि पंच समिती समन्वयक सुरेंद्र हरमलकर यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मात्र या घटनेमुळं क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :