मुंबई Jitesh Sharma : भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणं आणि कामगिरी करणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं कारण यामुळंच खेळाडूला ओळख मिळते. पण आरसीबीचा यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मानं एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणला की, टीम इंडियामध्ये खेळूनही त्याला आरसीबीमध्ये सामील झाल्यानंतर जितकी ओळख मिळाली तितकी मिळाली नाही. आता चाहते त्याच्या ऑटोग्राफसाठी रांगा लावतात, जेव्हा तो भारताकडून खेळत होता तेव्हा असं होत नव्हतं.
Everyday, he’s hustlin’! 💪#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/XXHs9vKiZ9
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 16, 2025
आरसीबीकडून खरी ओळख मिळाली : खरंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात जितेश शर्मा त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल बोलत होता. यादरम्यान तो म्हणाला, "जेव्हा मी सय्यद मुश्ताक अली खेळायला गेलो तेव्हा लोकं जितेश, जितेश, आरसीबी, आरसीबी असं ओरडत होते. मग मला जाणवलं की मी कोणत्याही लहान संघात गेलो नाही. आरसीबीकडून खेळणं ही काही छोटी गोष्ट नाही. या संघात एक वेगळीच भावना आहे, कारण 100-150 लोक ऑटोग्राफची वाट पाहत होते. याआधी, जेव्हा मी भारताकडून खेळलो होतो, तेव्हा 2 लोकही आले नव्हते. तेव्हा मला वाटलं की ही फ्रँचायझी काहीतरी वेगळी आहे."
चुकून झाला क्रिकेटर : अमरावती येथील रहिवासी जितेशनं त्याच्या प्रवासाबद्दल पुढं सांगितलं की, त्याच्या परिसरात खेळ फक्त मनोरंजनासाठी खेळले जात होते. सुरुवातीला त्याला क्रिकेटरही व्हायचं नव्हतं. एनडीएद्वारे सैन्यात भरती होण्याचं त्याचं ध्येय होतं, परंतु राज्य पातळीवर खेळण्यासाठी त्याला 25 टक्के सूट मिळाली. म्हणून, त्यानं त्याच्या मित्राच्या सल्ल्यानुसार एक चाचणी दिली. यष्टीरक्षकांच्या रकान्यात फक्त 3 नावं पाहून त्यानं आपलं नाव लिहून ठेवलं आणि तेव्हाच त्याचं आयुष्य बदललं. सैन्यात भरती होण्याऐवजी तो क्रिकेटपटू बनला.
𝐉𝐢𝐭𝐞𝐬𝐡 𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐚: 𝐀𝐜𝐜𝐢𝐝𝐞𝐧𝐭𝐚𝐥 𝐂𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭𝐞𝐫, 𝐈𝐧𝐭𝐞𝐧𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐖𝐢𝐧𝐧𝐞𝐫 🙌
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 16, 2025
Talented, Brave, Humble and Smart - attributes not often associated with the same individual. But, he’s different… This is the story of Jitesh Sharma - the man who is… pic.twitter.com/tNlRprM89j
जितेशची कामगिरी कशी : जितेशच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं भारतासाठी 9 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो काही खास कामगिरी करु शकला नाही. तो फक्त 14.28 च्या सरासरीनं फक्त 100 धावा करु शकला. त्याच वेळी, आयपीएल 2025 मध्ये, त्यानं बंगळुरुसाठी 4 डावांमध्ये 29च्या सरासरीनं आणि 157 च्या स्ट्राईक रेटनं 88 धावा केल्या आहेत. या स्पर्धेतील एकूण विक्रमाबद्दल बोलायचं झालं तर, जितेशनं 46 सामन्यांमध्ये 23 च्या सरासरीनं आणि 151 च्या स्ट्राईक रेटनं 818 धावा केल्या आहेत.
हेही वाचा :