अबूधाबी (युएई) IRE vs SA 1st ODI Live Streaming : आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या T20 मालिकेनंतर आता तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकत मालिकेची विजयी सुरुवात करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
Tickets for the upcoming Ireland v South Africa T20I and ODI series in Abu Dhabi, are now on sale: https://t.co/0wcYt6VhR6#BackingGreen ☘️🏏 pic.twitter.com/7xM0wh9bSz
— Cricket Ireland (@cricketireland) September 20, 2024
T20 मालिकेत काय झालं : आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेली दोन सामन्यांची T20 मालिका 1-1 नं बरोबरीत सुटली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आयर्लंडवर 8 गडी राखत दणदणीत विजय मिळवला होता. पण मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आयर्लंडनं सर्वांनी धक्का देत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. आयर्लंडनं T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवण्याची ती पहिलीच वेळ होती. पहिला T20 सामना 8 गडी राखून जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या T20 सामन्यात आयर्लंडकडून 10 धावांनी पराभव झाला. या विजयात आयर्लंडकडून खेळणाऱ्या दोन भावांची भूमिका निर्णायक ठरली. रग्बी खेळून क्रिकेटमध्ये आलेल्या मोठ्या भावानं फलंदाजीत शतक झळकावलं. त्यानंतर धाकट्या भावानं घातक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
WHAT A NIGHT.
— Cricket Ireland (@cricketireland) September 29, 2024
Ireland win first-ever Men's T20I against South Africa (and tie the series 1-1).
Match report 👉 https://t.co/8t3QAMVQpx#IREvSA #BackingGreen pic.twitter.com/VNlfxVYNTz
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड : दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण आठ वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सहा सामने जिंकले आहेत. तर आयर्लंडनं एक सामना जिंकला आहे. तर दोन्ही संघांदरम्यान एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
खेळपट्टी कशी असेल : अबुधाबीतील झायेद क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरते. विशेषत: सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना स्विंगची मदत मिळते. जसजसा सामना पुढं जाईल तसतसं खेळपट्टीचं स्वरुप बदलू शकते. त्यामुळं टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.
MISSED THE WIN?
— Cricket Ireland (@cricketireland) September 30, 2024
No problem, catch the highlights of last night's game here: https://t.co/LAA6OO1W7y#BackingGreen #IREvSA pic.twitter.com/85U0P63yVq
आयर्लंड वि दक्षिण आफ्रिका पूर्ण वेळापत्रक :
- पहिला T20 - 27 सप्टेंबर, दक्षिण आफ्रिका 8 विकेटनं विजयी
- दुसरा T20 - 29 सप्टेंबर (आयर्लंड 10 धावांनी विजयी)
- पहिला वनडे - आज (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी)
- दुसरा वनडे - 4 ऑक्टोबर (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी)
- तिसरा वनडे - 7 ऑक्टोबर (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी)
Tickets for the upcoming Ireland v South Africa T20I and ODI series in Abu Dhabi, are now on sale: https://t.co/0wcYt6VhR6#BackingGreen ☘️🏏 pic.twitter.com/7xM0wh9bSz
— Cricket Ireland (@cricketireland) September 20, 2024
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना कधी खेळला जाईल?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना बुधवार, 2 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना कुठं खेळवला जाईल?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी इथं होणार आहे.
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना किती वाजता सुरु होईल?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता सुरु होईल.
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना भारतात टीव्हीवर दिसणार नाही.
WHAT A NIGHT.
— Cricket Ireland (@cricketireland) September 29, 2024
Ireland win first-ever Men's T20I against South Africa (and tie the series 1-1).
Match report 👉 https://t.co/8t3QAMVQpx#IREvSA #BackingGreen pic.twitter.com/VNlfxVYNTz
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही फॅनकोड ॲपवर पाहू शकाल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
- आयर्लंड एकदिवसीय संघ : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, अँड्र्यू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, गेविन होए, फिओन हँड, ग्रॅहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रीज, अँडी मॅकब्राईन, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, क्रेग यंग
- दक्षिण आफ्रिका एकदिवसीय संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनीएल बार्टमन, नंद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, ब्योर्न फोर्टुइन, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स, रासी वान डेर डुसेन, काइल वेरिन आणि लिझाद विल्यम्स.
हेही वाचा :