मुल्लानपूर RCB Beat PBKS by 7 Wickets : इथं झालेल्या आयपीएलच्या 37व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं पंजाब किंग्जचा 7 विकेटनं दारुण पराभव करत हंगामातील पाचवा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघांमध्ये 48 तासांपूर्वी म्हणजेच 18 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला होता. मात्र बेंगळुरुनं हा सामना जिंकत त्या पराभवाची व्याजासह परतफेड केली आहे. या विजयासह बेंगळुरुनं गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
R E M O N T A D A. 🥶
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 20, 2025
Nailed the reverse fixture. 2 very crucial points! 👊 pic.twitter.com/uTxdOWVi9k
पंजाबची अडखळत फलंदाजी : या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदारनं नाणेफेक जिंकत पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. यानंतर प्रथम फलंदाजी करायला आलेल्या पंजाबला प्रभसीमरन सिंग आणि प्रियांश आर्या या सलामी जोडीनं आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी 4.1 षटकांत 42 धावांची भागीदारी केली. मात्र, यानंतर प्रियांश आर्याच्या रुपात पंजाबला पहिला धक्का बसला आणि यानंतर ठराविक अंतराने पंजाबच्या विकेट पडत राहिल्या. कर्णधार श्रेयस अय्यर (6), निहाल वडेरा (5) आणि मार्कस स्टोइनिस (1) हे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले. मात्र जोश इंग्लिश (29), शशांक सिंग (31) आणि मार्को जॉन्सन (25) यांनी केलेल्या उपयुक्त खेळीमुळं पंजाबला निर्धारित 20 षटकार 6 बाद 157 धावा करता आल्या. बेंगळुरु कडून कृणाल पांड्या आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
I.C.Y.M.I 🥰pic.twitter.com/Ody2OXjTrG https://t.co/zm2xWNU9QP
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 20, 2025
विराटचं, पडिकलचं अर्धशतक : यानंतर पंजाब न दिलेल्या 158 धावांच्या पाठलाग करायला उतरलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर फिल साल्ट पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या देवदत्त पडिकल आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. परंतु तेराव्या शतकात देवदत्त पडिकल 61 धावा करुन बाद झाला आणि ही भागीदारी तुटली. यानंतर विराट कोहलीनं कर्णधार रजत पाटीदारच्या साथीनं आरसीबी ला विजयाच्या जवळ नेलं. रजत पाटीदार 12 धावा करून बाद झाला. मात्र तोपर्यंत आरसीबीचा विजय जवळ जवळ निश्चित झाला होता. आरसीबीकडून विराट कोहलीनं सर्वाधिक नाबाद 73 धावा केल्या. तर पंजाब कडून अर्शदीप सिंग, हरप्रीत बरार आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
Jitesh Sharma dials 6⃣ to seal it in style 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
Virat Kohli remains unbeaten on 73*(54) in yet another chase 👏@RCBTweets secure round 2⃣ of the battle of reds ❤
Scorecard ▶ https://t.co/6htVhCbltp#TATAIPL | #PBKSvRCB pic.twitter.com/6dqDTEPoEA
गुणतालिकेत आरसीबी तिसऱ्या स्थानी : या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यांनी या हंगामात आतापर्यंत आठ सामने खेळले असून यातील पाच सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला तर तीन सामन्यात त्यांचा पराभव झाला. परिणामी त्यांचे दहा गुण झाले असून प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी त्यांनी आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. विशेष म्हणजे आरसीबीनं मिळवलेले हे पाचही विजय त्यांच्या अवे सामन्यातील आहेत. त्यांनी घरच्या मैदानावर तीन सामने खेळले आणि त्या तिन्ही सामन्यात त्यांचा पराभव झाला.
Another day, another FIFTY in a run chase 🏃
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
Virat Kohli now holds the record for the most 50+ scores in #TATAIPL 🫡
Updates ▶ https://t.co/6htVhCbltp#PBKSvRCB | @imVkohli pic.twitter.com/7OzXjw5Yug
हेही वाचा :