ETV Bharat / sports

IPL मध्ये आज RR vs GT आमनेसामने; राजस्थान हल्ला बोल करत 'करो या मरो' सामना जिंकणार? - RR VS GT MATCH PREVIEW

इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 47वा सामना आज राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) याच्यात खेळवला जाणार आहे.

RR vs GT Match Preview
राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (ETV Bharat Graphics)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 28, 2025 at 12:17 PM IST

2 Min Read

जयपूर RR vs GT Match Preview : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 47वा सामना आज राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) याच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. राजस्थानसाठी हा सामना करा किंवा मरो असा आहे, जर त्यांचा आज पराभव झाला तर स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनेल. त्याच वेळी, गुजरातला हा सामना जिंकून पुन्हा पॉइंट टेबलमध्ये नंबर-1 स्थान मिळवायची संधी असेल.

गुजरातची सांघिक कामगिरी : गुजरात टायटन्सचा हंगाम चांगला गेला आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या आठ सामन्यांपैकी सहा सामने जिंकले आहेत आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या जवळजवळ आहेत. ते सध्या 12 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शुभमन गिलनं संघाचं शानदार नेतृत्व केलं आहे. साई सुदर्शन आणि जॉस बटलर यांनीही सातत्यानं धावा केल्या आहेत. दरम्यान, प्रसिद्ध कृष्णा या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आहे, तर मोहम्मद सिराज देखील उत्तम फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात गुजरातनं ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा 39 धावांनी पराभव केला.

राजस्थानची निराशजनक कामगिरी : दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सची या हंगामात मोहीम खूपच निराशाजनक राहिली आहे. त्यांनी 9 पैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत तर सात सामने गमावले आहेत, त्यामुळं ते 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहेत. संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत, रियान परागनं पाच सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलं आहे आणि राजस्थाननं आसामच्या या अष्टपैलू खेळाडूच्या नेतृत्वाखाली चार सामने गमावले आहेत. विजयाच्या जवळ पोहोचल्यानंतर या संघानं तीन सामने गमावले आहेत, विशेषतः लक्ष्याचा पाठलाग करताना, जी चिंतेची बाब आहे. मागील सामन्यात, राजस्थानला एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 5 विकेट शिल्लक असताना शेवटच्या दोन षटकांत 18 धावा करता आल्या नाहीत, तर दिल्ली आणि लखनऊविरुद्ध शेवटच्या षटकात त्यांना 9 धावा करता आल्या नाहीत.

RR विरुद्ध GT हेड टू हेड रेकॉर्ड : दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, गुजरातचं राजस्थानवरील वर्चस्व स्पष्टपणे दिसून येतं. कारण आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 7 सामने खेळले गेले आहेत ज्यात गुजरातनं 6 सामने जिंकले आहेत तर राजस्थानला फक्त 1 सामना जिंकता आला आहे. हा सामना जिंकून राजस्थान आपली आकडेवारी काही प्रमाणात बदलू शकतो परंतु प्लेऑफमध्ये पोहोचण्याची त्यांची शक्यता नगण्य आहे.

सवाई मानसिंग स्टेडियमचा खेळपट्टी कशी असेल : सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी सहसा मंद असते आणि स्ट्रोक खेळणं थोडं कठीण होतं. येथील खेळपट्टीवर 170-180 चा स्कोअर होतो. आतापर्यंत इथं खेळलेल्या 2 सामन्यांमध्ये एका सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे आणि दुसऱ्यानं प्रथम फलंदाजी करताना विजय मिळवला आहे. लखनऊनं इथं शेवटचा सामना फक्त 2 धावांनी जिंकला. तसंच इथं धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा रेकॉर्ड चांगला आहे, त्यामुळं नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. गेल्या वर्षीपासून जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सात सामन्यांपैकी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं चार सामने जिंकले आहेत, ज्यामध्ये पहिल्या डावाचा सरासरी स्कोअर 184 आहे. दिवसाचं तापमान 40 अंश सेल्सिअस ओलांडलं आहे, तर संध्याकाळी वातावरण थोडं थंड असेल.

RR vs GT संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, जोफ्रा आर्चर, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, आकाश मधवाल, संदीप शर्मा, तुषार देशपांडे/शुभम दुबे

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, साई सुदर्शन, जोस बटलर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान, आर साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा

हेही वाचा :

  1. बीसीसीआयनं घेतली ACTION... रिषभ पंतसंह अख्ख्या लखनऊ संघावर मोठी कारवाई
  2. 3269 दिवसांनंतर पांड्याची अर्धशतकी खेळी, RCB चा गुणतालिकेत धमाका; गुजरातला न खेळताच धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.