ETV Bharat / sports

बीसीसीआयनं घेतली ACTION... रिषभ पंतसह अख्ख्या लखनऊ संघावर मोठी कारवाई - MI VS LSG MATCH

लखनऊ सुपर जायंट्स संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध चांगली कामगिरी करु शकला नाही. आता पराभवानंतर लखनऊ संघाला आणखी एक धक्का बसला आहे.

Rishabh Pant Fined
रिषभ पंत (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 28, 2025 at 10:50 AM IST

1 Min Read

मुंबई Rishabh Pant Fined : आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाला मुंबई इंडियन्सविरुद्ध 54 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना एकूण 215 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात लखनऊ संघ फक्त 161 धावा करु शकला. त्यातच आता स्लो ओव्हर रेटमुळं, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत आणि प्लेइंग इलेव्हनमधील सर्व खेळाडूंवर कारवाई केली आहे.

रिषभ पंतला 24 लाख रुपयांचा दंड : आयपीएल प्रेस रिलीजमध्ये असं म्हटलं आहे की, आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत स्लो ओव्हर रेटच्या उल्लंघनाशी संबंधित चालू हंगामात त्यांनी दुसऱ्यांदा याचं उल्लंघन केलं होतं. त्यामुळं या कारणास्तव कर्णधार ऋषभ पंतला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या 25 टक्के (जे कमी असेल ते) दंड आकारला जाईल.

सूर्यकुमार यादव आणि रिकेल्टनचं अर्धशतक : या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. संघाकडून सूर्यकुमार यादवनं 28 चेंडूत 54 धावा केल्या. त्यानं आपल्या डावात चार चौकार आणि चार षटकार मारले. त्याच्याशिवाय रायन रिकेल्टननं 58 धावांचं योगदान दिलं. नमन धीरनं 25 धावा केल्या. या खेळाडूंमुळंच मुंबई इंडियन्सनं 215 धावा केल्या.

जसप्रीत बुमराहनं चार बळी घेतले : यानंतर लखनऊकडून आयुष बदोनीनं 35 धावा आणि मिशेल मार्शनं 34 धावा केल्या. या खेळाडूंनी चांगली सुरुवात केली होती, परंतु ते त्याचं मोठ्या डावात रुपांतर करु शकले नाहीत. निकोलस पूरननं 27 धावा आणि डेव्हिड मिलरनं 24 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं चार षटकांत 22 धावा देत चार महत्त्वाचे बळी घेतले. त्याच वेळी ट्रेंट बोल्टनं तीन बळी घेतले.

हेही वाचा :

  1. 3269 दिवसांनंतर पांड्याची अर्धशतकी खेळी, RCB चा गुणतालिकेत धमाका; गुजरातला न खेळताच धक्का
  2. बुमराह-बोल्टची घातक गोलंदाजी, मुंबईचा सलग पाचवा विजय; DC, RCB ला धक्का गुणतालिकेत भूकंप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.