अहमदाबाद IPL Winners List : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2008 मध्ये सुरु झाली आणि तेव्हापासून या स्पर्धेनं क्रिकेट चाहत्यांना खूप उत्साह दिला आहे. दरवर्षी एक नवीन संघ विजेता म्हणून उदयास येतो, तर काही संघांनी स्पर्धेत वर्चस्व गाजवलं आहे. आयपीएलच्या 18 व्या हंगामात, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्ज संघात अंतिम सामना झाला. या सामन्यात आरसीबीनं 6 धावांनी विजय मिळवत विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे.
𝐄𝐄 𝐒𝐀𝐋𝐀 𝐂𝐔𝐏 𝐍𝐀𝐌𝐃𝐔! ❤
— Star Sports (@StarSportsIndia) June 3, 2025
Congratulations, @RCBTweets! 🤩
LIVE NOW ➡ https://t.co/XmOkxMNq4t#IPLFinals 👉 Trophy Presentation on Star Sports Network & JioHotstar pic.twitter.com/Ud1PcaaDtf
खेळाडूंसाठी पर्वणी : ही अशी स्पर्धा आहे ज्यानं त्या खेळाडूंना रातोरात चमकवलं ज्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळत नव्हती. इतकंच नाही तर या स्पर्धेत अशा अज्ञात खेळाडूंनाही परत आणलं ज्यांना राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं असेल किंवा ज्यांची कारकीर्द ठप्प झाली असेल. त्यांना पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळाली.
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 𝐎𝐅 #𝐓𝐀𝐓𝐀𝐈𝐏𝐋 𝟐𝟎𝟐𝟓 🏆🤩
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
The ROYAL CHALLENGERS BENGALURU have done it for the first time ❤#RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/x4rGdcNavS
कोणत्या संघानं खेळल्या सर्वाधिक वेळा फायनल : स्पर्धेच्या इतिहासत चेन्नई सुपर किंग्जनं सर्वाधिक वेळा (10) आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्सनं सहा वेळा आणि केकेआरनं 4 वेळा अंतिम फेरी गाठली आहे. चेन्नई सुपर किंग्जनं 10 पैकी पाच वेळा विजेतेपद जिंकलं आहे आणि पाच वेळा उपविजेतेपद मिळवलं आहे.

मुंबईनं जिंकल्या 6 पैकी 5 फायनल : तर मुंबईनं सहा पैकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. याशिवाय चार वेळा फायनल खेळलेल्या केकेआर संघानं ३ वेळा ट्रॉफी जिंकली आहे. आरसीबी संघानंही 3 वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु आजपर्यंत त्यांना एकही विजेतेपद जिंकता आलेलं नाही.
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 ⭐️ RCB PLAYED BOLD! 😇
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 3, 2025
17 Years, 6256 Days, 90,08,640 Minutes later, the wait finally ends. 🙌🤯
The IPL Trophy is finally coming home. And we CANT KEEP CALM! 🤩😍❤️ pic.twitter.com/lQvtLff9o2
गुजरातही राहिला विजेता : दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांनीही प्रत्येकी एकदा अंतिम सामना खेळला आहे. ज्यामध्ये 2008 च्या पहिल्या आयपीएल हंगामात आरआरनं विजेतेपद जिंकलं होतं, तर पंजाब-दिल्ली संघांना एकही विजेतेपद जिंकता आलं नव्हतं. गुजरात टायटन्सनं 2022 मध्ये पदार्पण केलं आणि आतापर्यंत त्यांनी दोनदा आयपीएल फायनल खेळली आहे.
हेही वाचा :