ETV Bharat / sports

राजस्थान 'हल्ला बोल' करत दिल्लीविरुद्ध 'रॉयल' विजय मिळवणार? कशी असेल प्लेइंग 11, वाचा - DC VS RR MATCH TODAY

आयपीएल 2025 च्या 32व्या सामन्यात आज 16 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल.

DC vs RR Match
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (ETV Bharat Graphics)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : April 16, 2025 at 11:02 AM IST

2 Min Read

नवी दिल्ली DC vs RR Match : आयपीएल 2025 च्या 32व्या सामन्यात आज 16 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल. दिल्लीचा संघ हा सामना त्यांच्या होमग्राउंड अरुण जेटली स्टेडियमवर खेळेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:30 वाजता सुरु होईल.

दोन्ही संघांची कामगिरी कशी : यापूर्वी 13 एप्रिल रोजी याच मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला होता, जो मुंबईनं 12 धावांनी जिंकला होता. दिल्लीला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. या हंगामात दिल्लीचा हा पहिलाच पराभव होता. याआधी त्यांनी सलग चार सामने जिंकले होते. आता, राजस्थानविरुद्धचा हा सामना जिंकून, दिल्ली संघ पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतू इच्छितो. तर दुसरीकडे, राजस्थान संघही विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. राजस्थान रॉयल्सनं आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत आणि फक्त दोन सामने जिंकले आहेत. राजस्थानचे 4 गुण आहेत आणि ते संघाच्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड कसा : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 29 सामने खेळले गेले आहेत. राजस्थान संघानं 15 सामने जिंकले आहेत तर दिल्लीनं 14 वेळा विजय मिळवला आहे. गेल्या 5 सामन्यांमध्ये राजस्थाननं वरचढ कामगिरी केली आहे. राजस्थाननं 3 सामने जिंकले आहेत तर दिल्लीनं 2 सामने जिंकले आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ 9 वेळा एकमेकांसमोर आले आहेत, ज्यात डीसीनं 6 वेळा विजय मिळवला आहे. तर, राजस्थानला फक्त 3 वेळा विजय मिळवता आला आहे.

अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल : दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. वेगवान आउटफिल्ड आणि लहान मैदानामुळं फलंदाजांना इथं धावा करणं सोपं होतं. दिल्लीच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही. अशा परिस्थितीत, वेगवान गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी थोडे अधिक कष्ट करावे लागतील. मात्र सामना जसजसा पुढं जाईल तसतसे फिरकीपटूंना इथं थोडी मदत मिळते.

अरुण जेटली स्टेडियमची आकडेवारी : अरुण जेटली स्टेडियमवर आतापर्यंत 91 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 44 वेळा सामना जिंकला आहे. तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं 46 सामने जिंकले आहेत. या मैदानावर पहिल्या डावात सरासरी 167 धावा आहे. या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम हैदराबादच्या नावावर आहे, 2024 मध्ये एसआरएचनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 266/7 धावा केल्या होत्या. सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम दिल्लीच्या नावावर आहे; 2013 मध्ये, दिल्ली संघाला सीएसकेविरुद्ध फक्त 83 धावा करता आल्या.

दिल्लीचं हवामान कसं असेल? : हवामान अहवालानुसार, 16 एप्रिल रोजी दिल्लीत खूप उष्णता असेल. दिवसाचं कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल. मग खेळाडूंना उष्णतेपासून थोडा आराम मिळू शकेल. या दिवशी पावसाची शक्यता नाही. अशा परिस्थितीत, चाहत्यांना संपूर्ण 40 षटकांचा खेळ पाहता येईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :

दिल्ली कॅपिटल्स : जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डु प्लेसिस/करुण नायर, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.

इम्पॅक्ट प्लेयर : मुकेश कुमार

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (c/wk), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा.

इम्पॅक्ट प्लेयर : कुमार कार्तिकेय सिंग/शुभम दुबे

हेही वाचा :

  1. 62/2 ते 95/10... शाहरुखच्या संघानं कसा गमावला हातातला सामना?
  2. 184 चेंडू, 206 धावा, 20 विकेट... PBKS vs KKR सामन्यात घडला इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.