ETV Bharat / sports

17 सामने, 6 शहरं... BCCI कडून IPL च्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर - IPL RESUME DATE

बीसीसीआयनं आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार लीग 17 मे पासून पुन्हा सुरु होईल आणि एकूण 17 सामने 6 ठिकाणी खेळवले जातील.

IPL
IPL (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : May 12, 2025 at 11:19 PM IST

2 Min Read

मुंबई IPL New Dates : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळं बीसीसीआयनं 9 मे रोजी आयपीएल 1 आठवड्यासाठी स्थगित केलं होतं. याआधी 8 मे रोजी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्यंतरी थांबवण्यात आला होता. मात्र0 आता दोन्ही देशांमधील युद्धबंदीनंतर, बीसीसीआयनं उर्वरित सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. नवीन वेळापत्रकानुसार, लीग 17 मे पासून पुन्हा सुरु होईल आणि एकूण 17 सामने 6 ठिकाणी खेळवले जातील. याशिवाय, अंतिम सामना 3 जून रोजी होईल.

कधी होतील सामने : बीसीसीआयनं उर्वरित सामने बेंगळुरु, दिल्ली, लखनऊ, मुंबई, अहमदाबाद आणि जयपूर या 6 ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत, उर्वरित लीग सामने 17 मे ते 25 मे दरम्यान खेळवले जातील, ज्यामध्ये 2 डबल हेडरचा समावेश आहे. याशिवाय, प्लेऑफ सामने 29 मे पासून सुरु होतील आणि अंतिम सामना 3 जून रोजी होईल. परंतु बीसीसीआयनं अद्याप प्लेऑफ सामन्यांसाठी ठिकाणं निश्चित केलेली नाहीत. ती नंतर जाहीर करण्यात येतील.

आयपीएलकडून प्रेस रिलीज : आयपीएलनं एक प्रेस रिलीज जारी करताना म्हटलं आहे की, 'बीसीसीआयला टाटा आयपीएल 2025 पुन्हा सुरू झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. एकूण 17 सामने 6 ठिकाणी खेळवले जातील, 17 मे पासून सुरु होतील आणि 3 जून रोजी अंतिम सामना होईल. नवीन वेळापत्रकात दोन डबल-हेडर सामने समाविष्ट आहेत, जे दोन रविवारी खेळवले जातील. बीसीसीआय पुन्हा एकदा भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करण्याची ही संधी घेते, ज्यांच्या प्रयत्नांमुळं क्रिकेटचे सुरक्षित पुनरागमन शक्य झालं आहे.

IPL च्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक :

  • 17 मे, शनिवार, सायंकाळी 7:30 वाजता: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
  • 18 मे, रविवार, दुपारी 3:30 वाजता: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, जयपूर
  • 18 मे, शनिवार, सायंकाळी 7:30 वाजता: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, दिल्ली
    19 मे, सोमवार, सायंकाळी 7:30 वाजता: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, लखनौ
  • 20 मे, मंगळवार, सायंकाळी 7:30 वाजता: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दिल्ली
  • 21 मे, बुधवार, सायंकाळी 7:30 वाजता: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
  • 22 मे, गुरुवार, संध्याकाळी 7:30 वाजता: गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, अहमदाबाद
  • 23 मे, शुक्रवार, सायंकाळी 7:30 वाजता: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, बंगळुरू
  • 24 मे, शनिवार, सायंकाळी 7:30 वाजता: पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, जयपूर
  • 25 मे, रविवार, दुपारी 3:30 वाजता: गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, अहमदाबाद
  • 25 मे, रविवार, सायंकाळी 7:30 वाजता: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली
  • 26 मे, सोमवार, सायंकाळी 7:30 वाजता: पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, जयपूर
  • 27 मे, मंगळवार, सायंकाळी 7:30 वाजता: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनौ
  • 29 मे, गुरुवार, संध्याकाळी 7:30 वाजता, क्वॉलिफायर 1
  • 30 मे, शुक्रवार, संध्याकाळी 7:30 वाजता, एलिमिनेटर
  • 01 जून रविवार, संध्याकाळी 7:30 वाजता, क्वॉलिफायर 2
  • 03 जून, मंगळवार, संध्याकाळी 7:30 वाजता अंतिम सामना

हेही वाचा :

  1. 14 वर्षाच्या कारकीर्दचा अंत... कोहलीचे 'हे' रेकॉर्ड आहेत अद्वितीय
  2. #269 Sign Off... विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला रामराम; इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.