जयपूर RR vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या 28व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) हे संघ आज एकमेकांशी भिडतील. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर दुपारी 3:30 वाजता खेळला जाईल. आयपीएल 2025 मध्ये राजस्थान आणि आरसीबी या दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत संमिश्र राहिली आहे, त्यामुळं दोन्ही संघांना आज जिंकून पॉइंट टेबलमध्ये त्यांचं स्थान सुधारवायचं आहे. सध्या, आरसीबी आणि राजस्थान गुणतालिकेत अनुक्रमे चौथ्या आणि सातव्या स्थानावर आहेत.
Today, your Royals play at home in Jaipur 💗
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 13, 2025
Today, your Royals give it their all in Jaipur 🔥 pic.twitter.com/6LsndOyYOO
दोन्ही संघांची कामगिरी कशी : राजस्थान संघ या हंगामात जयपूरच्या मैदानावर पहिला सामना खेळेल ज्यात तो जिंकण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत राजस्थान रॉयल्स संघानं 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना तीन पराभव पत्करावे लागले आहेत आणि फक्त 2 जिंकता आले आहेत. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचीही परिस्थिती अशीच आहे, ज्यामध्ये 5 सामने खेळल्यानंतर त्यांनी तीन जिंकले आहेत तर 2 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Shadow swings today ➡ light up the scene tomorrow! 💪#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/cbmeIPB4Rt
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 12, 2025
खेळपट्टीचा अहवाल काय : जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर इथं आपल्याला बॅट आणि बॉलमध्ये समान स्पर्धा पाहायला मिळते. इथं 200 धावांचा टप्पा ओलांडणं संघांसाठी अजिबात सोपं नाही. खेळपट्टीवर असलेल्या गवतामुळं, नवीन चेंडूचा सामना करणं सलामीवीर फलंदाजांसाठी सोपं काम नाही. मोठ्या सीमारेषांमुळं इथं फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके खेळणं थोडं कठीण आहे. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देतो.
Respect your legends. Love your legends! 💗 pic.twitter.com/l8IZlDfsIM
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 12, 2025
मैदानावरील विक्रम कसा : या मैदानावर आतापर्यंत 57 आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 20 वेळा विजय मिळवला आहे तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं 37 वेळा विजय मिळवला आहे.
Chat and chill before matchday thrill! 🤝🤩#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/B3NPKBmX9L
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 13, 2025
सवाई मानसिंग स्टेडियमवरील दोन्ही संघांचा रेकॉर्ड : जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर होणाऱ्या या दोन्ही संघांमधील सामन्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान आणि आरसीबी यांच्यात 9 सामने झाले आहेत, ज्यात राजस्थान रॉयल्स संघानं 5 सामने जिंकले आहेत, तर आरसीबी संघानं 4 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.
bro's aura in the college after this 📈🔥💗 pic.twitter.com/9iBbmN1twB
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 12, 2025
हेड टू हेड रेकॉर्ड काय : जर आपण आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोललो तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यात राजस्थाननं 14 सामने जिंकले आहेत तर आरसीबीनंही 15 सामने जिंकले आहेत. 2 सामन्यांमध्ये निकाल लागलेला नाही.
Throwback to some of our best wins in green ⏮💚
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 13, 2025
What’s your most memorable 'Go Green' game, 12th Man Army? #PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/HtuyH6JhNC
दोन्ही संघांची प्लेइंग 11 :
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, कुमार कार्तिकेय, तुषार देशपांडे.
इम्पॅक्ट प्लेअर : आकाश माधवाल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.
इम्पॅक्ट प्लेअर : रसिक सलाम/सुयश शर्मा
Arrive early to #RRvRCB for a proper show before the show! 🔥
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 12, 2025
Our HunaRR Manch winners are ready to wow you with their talent 💗 pic.twitter.com/OqIJhobPnB
हेही वाचा :