बेंगळुरु RCB vs DC Preview : आयपीएल 2025 चा 24वा लीग सामना आज म्हणजेच 10 एप्रिल रोजी बेंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल.
Their hearts beat 𝑩𝒐𝒍𝒅, and this bond is pure 𝑮𝒐𝒍𝒅! 🤝❤#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/mOLT29ENHf
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 10, 2025
दोन्ही संघांची आतापर्यंत कामगिरी कशी : आरसीबी संघानं या हंगामात आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी तीन जिंकले आहेत आणि फक्त एक सामना गमावला आहे. आरसीबी संघ सध्या 6 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तिन्हीही जिंकले आहेत. हा सामना जिंकत दिल्ली संघ आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
Salt be like, 'Mate, I want to practice playing bouncers, can you help?' 😏😁#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/rEvQN3utGn
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 9, 2025
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : जर आपण आकडेवारी पाहिली तर, या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वरचष्मा आहे. ज्यामध्ये दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 31 सामन्यांपैकी आरसीबीनं 19 सामने जिंकले आहेत तर दिल्लीला फक्त 11 सामने जिंकता आले आहेत. त्याच वेळी, एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये 12 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये आरसीबीनं 7 तर दिल्लीनं 4 सामने जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. दोन्ही संघांचा फॉर्म पाहता, या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे कारण लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाचा वरचष्मा असू शकतो. मात्र क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. अशा परिस्थितीत या सामन्यात काहीही भाकित करणं कठीण आहे.
.@akshar2026, one over from Abi in the powerplay? 😂👀 pic.twitter.com/GcSZ18FKE1
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 9, 2025
बंगळुरुची खेळपट्टी फलंदाजीसाठी स्वर्ग : आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर, या हंगामात आतापर्यंत इथं एक सामना खेळला गेला आहे, ज्यात आरसीबी संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ 169 धावा करु शकला होता, परंतु त्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या गुजरात टायटन्सनं 2 षटकांच्या आधीच सामना जिंकला. चिन्नास्वामीची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते, जिथं संघ 200 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य सहजपणे गाठू शकतात.
मैदानावरील विक्रम कसा : आतापर्यंत या मैदानावर एकूण 96 आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 41 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं 51 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. इथं पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 165 ते 170 धावांच्या दरम्यान दिसून आली आहे.
LET’S. ROAR. MACHA! 🐅 pic.twitter.com/kXfBzxnwBj
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 10, 2025
सामन्यादरम्यान बेंगळुरुमधील हवामान कसं असेल : या सामन्यादरम्यानच्या हवामानाबद्दल बोलायचं झालं तर, चाहते 10 एप्रिल रोजी बेंगळुरुमध्ये संपूर्ण सामन्याचा आनंद घेऊ शकतात. हवामान अहवालानुसार, पावसाची शक्यता नसली तरी, सामन्यादरम्यान तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे, त्यामुळं खेळाडूंना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार नाही.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.
दिल्ली कॅपिटल्स : जेक फ्रेझर मॅकगुर्क, केएल राहुल (यष्टीरक्षक), अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.
हेही वाचा :