नवी दिल्ली CSK vs RR Match : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या 62व्या सामन्यात, आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) हे संघ एकमेकांशी भिडतील. दोन्ही संघांमधील हा सामना अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली इथं संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. दोन्ही संघ आयपीएल 2025 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत, आजचा सामना जिंकून दोन्ही संघ त्यांच्या चाहत्यांना आनंदी होण्याची संधी देण्यासाठी मैदानात उतरतील.
𝗚𝗢𝗔𝗧 🆚 𝗬𝗢𝗔𝗧 in #TATAIPL 2025 tonight! 🔥
— Star Sports (@StarSportsIndia) May 20, 2025
14-year-old Vaibhav dazzled early (1-6 Overs), but the 43-year-old 'youngster' is known for finishing (17-20 Overs) with a bang! 🤩💪🏻
What will be the outcome tonight? 👀#IPLOnJioStar 👉🏻 #CSKvRR | TUE, MAY 20, 6.30 PM on Star… pic.twitter.com/P7tngWqcFF
राजस्थानचा शेवटचा सामना : स्टार विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ आज चेन्नईशी सामना करेल. या हंगामात खराब कामगिरी करुन आरआर संघानं चाहत्यांना निराश केलं आहे. राजस्थान फक्त 6 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे आणि आधीच प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. या हंगामात, आतापर्यंत, त्यांनी 13 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत आणि 9 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान संघ आज शेवटचा लीग सामना जिंकून हंगामाचा शेवट करण्याचा प्रयत्न करेल.
You CANNOT miss Captain Cool, #MSDhoni's second-last match this season! 💛
— Star Sports (@StarSportsIndia) May 20, 2025
Who among these Indian heroes will come out on top tonight? 👀
#IPLonJioStar 👉 #CSKvRR | TUE, MAY 20, 6:30 PM onwards only on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, Star Sports 2, Star Sports 2 Hindi &… pic.twitter.com/dOOijO8Y2G
सन्मानासाठी चेन्नई मैदानात : त्याच वेळी, आयपीएल 2025 हा 5 वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी एक खराब हंगाम ठरला आहे. अनुभवी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके देखील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे आणि सध्या 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये 10व्या स्थानावर आहे. सीएसकेनं 12 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. त्यांचे अजून दोन लीग सामने शिल्लक आहेत, त्यामुळं आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या सीएसकेला हे दोन्ही सामने जिंकून चाहत्यांमध्ये आपला सन्मान वाचवायचा आहे.
One last time in 2025. Halla Bol! 💗🔥 pic.twitter.com/u9sgbwy19l
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 20, 2025
सीएसके विरुद्ध आरआर हेड टू हेड रेकॉर्ड : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये समांतर स्पर्धा दिसून आली आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 30 आयपीएल सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. या काळात, सीएसकेनं 16 वेळा विजय मिळवला आहे. तर, राजस्थाननं 14 सामने जिंकले आहेत. मात्र दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या 5 सामन्यांमध्ये राजस्थाननं वर्चस्व गाजवले आहे आणि 4 वेळा विजयाची चव चाखली आहे. आज देखील दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक उच्च-स्कोअरिंग सामना होण्याची अपेक्षा आहे.
Let’s paint Delhi Yellove! 💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 19, 2025
Book your tickets for the #CSKvRR game tomorrow ➡️ https://t.co/ZqhVYBxPEr #CSKvRR #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/NUpwRxauxU
अरुण जेटली स्टेडियमचा खेळपट्टी अहवाल : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर इथं फलंदाजांचं वर्चस्व दिसून येतं. एकदा फलंदाज या खेळपट्टीवर सेट झाला की, तो सहजपणे मोठे फटके मारु शकतो. या मैदानाच्या सीमा लहान आहेत आणि आउटफील्ड खूपच वेगवान आहे. अशा परिस्थितीत फलंदाज सहजपणे फटके मारु शकतो. या खेळपट्टीवर, वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूसह काही मदत मिळते. त्याच वेळी, फिरकी गोलंदाज देखील जुन्या चेंडूनं फलंदाजांची शिकार करताना दिसतात. बहुतेक वेळा या खेळपट्टीवर 200 पेक्षा जास्त धावसंख्या सहज निघतात, त्यामुळं आजही दोन्ही संघांमध्ये उच्च धावसंख्या असलेला सामना होण्याची अपेक्षा आहे.
With your Whistles and Yellove!🥳💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 20, 2025
Lions are roar ready!🦁🔥 #CSKvRR #WhistlePodu pic.twitter.com/14pywfjCot
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
चेन्नई सुपर किंग्ज : डेव्हॉन कॉनवे, आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, मथिशा पाथिराना, नूर अहमद, खलील अहमद.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग, वानिंदू हसरंगा, तुषार देशपांडे, आकाश माधवन, क्विना मफाका, फजलहक फारुकी.
हेही वाचा :